शिंदेवाडी येथील हनुमान विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश…!
नातेपुते/ प्रतिनिधी
राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या वर्गाचा अंतिम निकाल परिषदेच्या संकेत स्थळावर घोषित करण्यात आला आहे. या परीक्षेत रयत शिक्षण संस्थेचे शिंदेवाडी येथील हनुमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असुन यामध्ये पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत ४० पैकी १९ पात्र तर आठवी स्कॉलरशिप परीक्षेत ३९ पैकी ८ पात्र ठरले.
यामध्ये वैष्णवी शिंदे -७५•६९,श्रीकांत सोलंकर- ७२.२२%, यशराज देशमुख- ७१. ५२,जान्हवी भोसले -७० .१३%, परीक्षित कदम- ६२. ५०%,शिवराज लिंबोरे- ५६. ९४%, वैष्णवी गोरे- ५६ .२५%,भूमी लिंबोरे -५६. २५%, उत्कर्ष धुमाळ- ५४ .८६%, श्रेया शिंदे- ५२ .०८ %,प्रीती जगदाळे ५१ .३८%, ज्ञानेश्वरी पालवे ५० .६९%, समृद्धी रणवरे- ४९ .३०%, सृष्टी सरुडकर- ४९.३०%,समर्थ शिंदे- ४५ .८३ %,गौरी धुमाळ -४५. ८३%, वेदिका पाटील -४५ .८३%,श्रेया जाधव -२५. १३%,ओंकार कदम ४४ .४४% तर आठवी स्कॉलरशिप परीक्षेत निशा थोरात ६६. ६६,सोहम कदम ५३.७४ ,विशाखा भोसले- ५३ .०६, सुप्रिया धायगुडे -52. 38, ओंकार शिंदे -५२. ३८,अभिषेक रूपनवर- ५०.३४ ,शुभम ठोंबरे- ४६ .९६,सृष्टी देशमुख ४३. ५३ या विद्यार्थ्यांनी गुण मिळवून यश संपादन केले आहे.
यामध्ये इयत्ता पाचवी विभाग प्रमुख सचिन पाटील,मार्गदर्शक अमोल बोडरे,पल्लवी सोनवले,बालाजी बोंबडे, इयत्ता आठवी विभाग प्रमुख पल्लवी सोनवले ,मार्गदर्शक बाळासाहेब क्षिरसागर ,महेश राठोड,शरद पाटोळे यांनी परीश्रम घेतले.यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य सूर्यकांत भालेराव,पर्यवेक्षिका मिताली देठे,गुरुकुल विभाग प्रमुख फिरोज मुलाणी तसेच स्थानिक स्कूल कमिटी, ग्रामस्थ, पालक , शिक्षक यांनी अभिनंदन केले.