छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ललित साहित्य वाचनोत्सव व ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन..!

सातारा/प्रतिनिधी
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ.ए पी जे. अब्दुल कलाम जयंतीच्या निमित्त मराठी विभागाने वाचन प्रेरणा दिन हा ललित साहित्याचे वाचन करून साजरा केला. तसेच या दिनाच्या निमित्ताने ग्रंथालय विभागाने विविध विषय विषयावरील नव्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले. रयत शिक्षण संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.शिवणकर यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम व पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमेस अभिवादन करून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

या निमित्ताने मार्गदर्शन करताना ते म्हणाले की विविध ग्रंथात आपल्याला ज्ञान,पण अलीकडे ग्रंथ वाचनाचे प्रमाण कमी जाणवत आहे. सर्वांनी जाणीवेने वाचन करावे.वाचनाने ज्ञान तर मिळतेच पण मनाचा विकास होतो.देश मोठा होण्यासाठी ज्ञानी आणि जबाबदार नागरिक निर्मिती आवश्यक आहे. ग्रंथ हे जग समजून घेण्याचे माध्यम आहे. त्यामुळे ग्रंथ नुसते आणून ठेवून उपयोग नाही तर वाचले पाहिजेत असे ते म्हणाले. या ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमास ग्रंथपाल प्रा.शिवाजी लोखंडे,उपप्राचार्या डॉ.अनिसा मुजावर,.डॉ.सुरेश झोडगे, मराठी विभाग प्रमुख डॉ.सुभाष वाघमारे,,, प्राध्यापक उत्तरेश्वर मराळ,उज्ज्वला दौंडे ,श्री .संजय भोसले, भरत सावंत , आणि ग्रंथालय विभागातील सर्व परिचर उपस्थित होते.कॉलेज मधील विविध विषयाच्या विभागानी पी.डी.एफ फाईल मध्ये विद्यार्थ्यांना ग्रंथ देवघेव केली.
दुपारी १२ वाजता मराठी विभागाने विद्यार्थी,प्राध्यापक यांच्या सहभाग घेऊन ललित साहित्य वाचन उत्सव साजरा केला.यात निबंध वाचन ,ललित गद्य वाचन ,वैचारिक वाचन ,कवितांचे वाचन विद्यार्थी व प्राध्यापक यांनी केले.आदित्य देशपांडे,आकांक्षा कांबळे,कु.कोमल यमगर,विशाल निकम, जयश्री पाटील,प्रा.राजेंद्र कदम,प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे,प्रा.डॉ.कांचन नलावडे,डॉ.मानसी लाटकर,प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,कोमल मस्के,.रुचिरा इंगळे.मानसी राव,प्रा.सुभाष वाघमारे इत्यादी विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सहभागी झाले.ऑनलाईन वाचन प्रेरणा दिन साजरा केला. डॉ.अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र,पुस्तक वाचनाचे महत्व ,पंचमीचे दिवस,वि.दा करंदीकर यांच्या कविता, पावसाचा निबंध या माहिती पटावरील समीक्षा ,इत्यादी प्रकारच्या ललित साहित्याचा वाचनात समावेश होता. भाषा आणि सामाजिक शास्त्रे विभागाने देखील विद्यार्थ्यांना पी.डी.एफ स्वरुपात पुस्तके दिली.स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक डॉ .शिवाजी पाटील याची मुलाखत व्ही.एम .वाहिनीच्या प्रतिनिधी यांनी घेतली. ग्रंथ प्रदर्शन आयोजित केल्यामुळे विविध विषयावर नवीन आलेल्या पुस्तकांची माहिती सर्वाना मिळाली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *