कर्मवीरचे शिक्षक अतुलकुमार पाटील यांची कन्या कु.सिध्दी पाटील हिने दहावीमध्ये 95% गुण मिळवून पटकविला प्रथम क्रमांक..!

पिलीव / सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील रयत शिक्षण संस्थेचेकर्मवीर भाऊराव पाटील विदयालय व रमेश खलिपे कनिष्ठ महाविद्यालय पिलीवचा मार्च 2019-20 मध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल 99.01टक्के लागला आहेसदरचा निकाल शाखा स्थापनेपासून पहिल्यांदाच एवढा निकाल लागला आहे.

या विदयालयातील एकूण 203विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 201विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विदयालयाचा निकाल 99.01टक्के एवढा लागला आहे यामध्ये 74विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये ,82 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले यामध्ये विदयालयात प्रथम तीन येणारे विद्यार्थी म्हणजे कर्मवीरचे मनमिळावू शिक्षक म्हणून ओळख असणारे अतुलकुमार पाटील सर यांची कन्या कु.सिध्दी अतुलकुमार पाटील,कु.संध्या अनिल धायगुडे या दोघींना समान 95% गूण मिळाले ने प्रथम क्रमांक विभागून दिला आहे 95 टक्के प्रथम,शुभांकर औंदुंबर बुगड व खदीजा हमीद तांबोळी यानांही समान 93.40%व्दितीय क्रमांक विभागून तर रोशनी आदिनाथ तांदळे 93% गूण मिळवून तृतीय सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे चेअरमन संजीव पाटील,विभागीय अधिकारी कमलाकर महामुनी,माजी शिक्षण संचालक नामदेवराव जरग,माजी सभापती तथा स्थानिक स्कुल कमीटीचे संग्रामसिंह जहागीरदार, संभाजीकाका भोसले, माजी सरपंच संग्राम पाटील, सरपंच नितीन मोहिते माळी,उपसरपंच संजय आर्वे व पिलीव परीसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, मुख्याध्यापक साहेबराव लेंडवे, पर्यवेक्षक मधुकर गायकवाड यांच्या कडुन अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *