पिलीव परिसरातील सेवानिवृत्त शिक्षकांनी कोव्हिड योध्दा म्हणून आपल्या अनुभवाचे योगदान द्यावे – लेंडवे एस.डी
पिलीव/सुजित सातपुते
आज आपला देश,राज्य,आपला परिसर सर्वच कोरोनाच्या प्रादुर्भावाखाली आहोत.हे जीवघेण संकट कधी संपेल हे निश्चितपणे सांगता येत नाही.कोरोनाचा दुष्परिणाम सर्वच क्षेत्रावर झालेला आहे व होत आहे.शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही.किती दिवस शाळा बंद ठेवायच्या ? पुढील पिढीच्या भविष्याच काय ?मुलांच शिक्षणही थांबवून चालणार नाही.देश संकटात असताना आपण घरी बसुन चालणार नाही देश्यासाठी,आपल्या राज्यासाठी, आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी म्हणून आपण काही करु शकतो का?याचं चिंतन मनन करुया आपल्या गावातील शाळा सुरु केल्याच तर physical distance,santiraysing, test ई .खबरदारी घेऊन चालवाव्या लागतील त्यावेळी शिक्षकांची संख्या फारच कमी पडनार आहे त्यात पुर्वीचीच अनेक शिक्षकांची पदे रिक्त आहेत.शासन विद्यार्थ्यांकडून मिळनार्या फीमधे वाढ करण्यास मान्यता देणार नाही.कदाचीत फी घेण्यास शाळांना मान्यताही देणार नाही.त्यामूळे शाळा 0 बजेटवरही चालवाव्या लागतील.जेवढे कार्यरत शिक्षक आहेत तेवढेच ज्यादा शिक्षक लागतील.या महामारीच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी मी पिलीव आणी पिलीव परिसरातील जे शिक्षक सेवानिवृत्त आहेत,ज्यांचेकडे वेळ आणि आवड आहे.अशा सन्मानिय शिक्षकांनी देशहितासाठी म्हणून ज्यांची तुम्ही सेवाकाळात घडविलेल्या विद्यार्थ्यांच्या आशीर्वादाने शारिरीक व मानसीकदृष्ठ्या तंदुरुस्थ असाल आणि अद्यापनच्या कामाची आवड असेल त्या गुरुजनांनी आपला किमान एक सत्र होईपर्यंत, कोरोनाचे सावट कमी होईपर्यंत आपल्या अनुभवाचे योगदान दिल्यास आपल्याही हातून सीमेवर लढणार्या सैनिकप्रमाणे,कोरोना विरुद्ध लढणार्या डॉक्टर,कर्मच्यारी,पोलीस यांचे प्रमाणेच राष्ट्रीय कार्य घडेल व आपला गाव व समाज आपल्याला बहुमोल आशिर्वाद देतील तरी इछूकांनी अतिथी शिक्षक म्हणून आपले 1)नाव 2)शैक्षणिक पात्रता 3)पत्ता4)मो.नं. ई माहिती मुख्याध्यापक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव यांना कोणत्याही माध्यमद्वारे द्यावे अशी माळशिरस टाईम्सच्या माध्यमातून मुख्यद्यापक लेंडवे सर यांनी नम्र विंनती केली आहे.