कर्मवीर विद्यालयाचे मुख्यद्यापक श्री.लेंडवे एस.डी यांचे संचार बंदीचे नियम पाळत पालकांना आवाहन…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत शिकत आसणार्या विद्यार्थांच्या पालकांना मुख्यद्यापक श्री.लेंडवे एस.डी यांनी संचार बंदीचे नियम पाळत माळशिरस टाईम्सच्या माध्यमातून आवाहन केले आहे कि शालेय पोषण आहार योजने अंतर्गत दिनांक 6 एप्रिल 2020 पासून ते दिनांक 9 एप्रिल 2020 पर्यंत सकाळी 8 ते 12 या वेळेत तांदूळ व डाळीचे वाटप करण्यात येणार आहे.तरी तांदूळ व डाळी घेण्यासाठी सात किलो तांदूळ बसेल एवढी एक कापडी पिशवी व एक-एक किलो दाळ बसेल एवढ्या दोन पिशव्या व तोंडाला मास्क किंवा रुमाल लावून दिलेल्या वेळेत विध्यार्थांना न पाठविता स्वता पालकांनी हजर राहवे.संचार बंदीचे काटेकोरपणे पालन करत दोघांमध्ये किमान एक-एक मिटर अंतरावर ठेवून तांदूळ व दाळ घेण्यासाठी पालकांनी रांगेत उभे रहावे व एका पेक्षा जास्त मुले शिकत असतील तरी एक पालक आल्यास चालेल.परंतु संचार बंदीचे सर्व पालकांना काटेकोरपणे पालन करावे लागेल असे ही श्री.लेंडवे एस.डी यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.
