कर्मवीर विदयालयाचे आर. टी. एस. स्पर्धा परीक्षेमध्ये उज्ज्वल यश..!
पिलीव/सुजित सातपुते
रयत शिक्षण संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या RTS (रयत प्रज्ञाशोध )स्पर्धा परीक्षे मध्ये कमवीर भाऊराव पाटील विदयालय पिलीव ने 12 विदयार्थी गुणवत्ता यादीत आणून घवघवीत यश मिळवले आहे. त्याबद्दल कर्मवीर विद्यालयात सर्व शिष्यवृतीधारक विदयार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
दि. २ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या RTS परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयातील ८७ विदयार्थी प्रविष्ठ होते. तर पूर्ण संस्थेच्या पाचही विभागातील ११०७९ विदयार्थी ( ७वी ) प्रविष्ठ होते . त्यापैकी १७१ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यादी नुकतीच जाहीर झाली . त्यामध्ये पुढीलप्रमाणे विद्यार्थ्यानी आपला क्रमांक मिळवला .
सायली धनवडे ( ९वी ) ,
तनिष्का खटावकर (१२वी ), राजवर्धन पाटील ( १३ वा ),
प्रणिती महामुनी ( १५वी ),
ऋतुजा करे ( १६वी ),
समृद्धी पंडित ( १५ वी ),
मृण्मयी देशमुख ( १७वी ) ,
आदित्य महामुनी ( १७वा ),
सानिका सूळ( १८वी ),
सार्थक बुगड (१९वा ),
सुजल जाधवर( १९वा ) ,
जोहा शेख (१९वी )
या सर्व यशस्वी विदयार्थ्यांना मुख्याध्यापक साहेबराव लेंडवे , पर्यवेक्षक मधुकर गायकवाड , विभागप्रमुख दिपक माने , आपसिंग वसावे, विक्रम पाटील , सुवर्णा लिंगे ,मिनल घोडके , रुक्मिणी आठरे तसेच सर्व सेवकवृंद यांनी बहुमोल मार्गदर्शन केले .
या उज्ज्वल यशाबददल सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक
सेवकवृंद यांचे रयत शिक्षण संस्था , स्थानिक स्कूल कमिटी , शाळा व्यवस्थापन समिती , पालक व ग्रामस्थ यांनी गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.