पिलीव येथील कर्मवीर विद्यालयाचे RTS परिक्षेत उज्वल यश : अंतिम गुणवत्ता यादीत एकुण 12 विद्यार्थ्यांचा समावेश..!

पिलीव/सुजित सातपुते
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव या शाळेच्या एकुण 12 विद्यार्थ्यांनी रयत टॕलेंट सर्च (RTS) परीक्षेच्या अंतीम गुणवत्ता यादीत आपले नाव झळकविले असुन या सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी रु.1000 अशी दोन वर्षे रक्कम मिळणार असल्याचे कर्मवीर विद्यालयाचे मुख्यद्यापक श्री.लेंडवे एस.डी यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.रयत शिक्षण संस्थेचा हा प्रतिष्ठीत असा प्रकल्प असून या परिक्षेसाठी संपुर्ण संस्थेतून इयत्ता 7 वी चे विद्यार्थी बसतात.या वर्षीही फेब्रुवारी 2020 मधे ही परीक्षा घेण्यात आली होती.त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन पिलीव शाखेने या परीक्षेत दैदिप्यमान असे यश मिळवल्याबद्दल मध्य.विभागाचे कार्याध्यक्ष मा.संजीवकुमार पाटील विभागीय अधिकारी मा.कमलाकर महामुनी सहा. वि.अधिकारी मा.आब्बास मणेर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार ,संभाजीराव भोसले,नारायणकाका पाटील,जि.प सदस्य गणेश पाटील,सरपंच नितिन माळी,संग्राम पाटील,प्रकाश घाटे,अरिफखान पठाण,राहुल मदने,नितिन गबाले ,अविनाश जेऊरकर,पिलीव पत्रकार संघाचे अध्यक्ष सुजित सातपुते,दामोदर लोखंडे,प्रा.संजय पाटील,प्रमोद भैस,अभिजित तावरे, विक्रम भैस ,वैभव मेथवड़े,उमेश बोडरे,प्रकाश फलके,नानासाहेब देशमुख,केंद्रप्रमुख फासे सर,मुख्याध्यापक साहेबराव लेंड़वे,पर्यवेक्षक मधुकर गायकवाड़,विभागप्रमूख दिपक माने, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक,ग्रामस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *