पिलीव प्रा.आ.केद्रामध्ये उद्या होणार्या RAT व RTPCR टेस्टिंग कॅम्पमध्ये सर्वांनी टेस्ट करुन घ्यावी-डॉ.संतोष माने-देशमुख

पिलीव/सुजित सातपुते
उद्या शनिवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पिलीव येथे सकाळी 10 वाजता RAT व RTPCR टेस्टिंग चा कॅम्प होणार आहे.तरी सदर टेस्ट ही पिलीवसह परिसरातील ग्रामस्थांनी करुन घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष माने-देशमुख यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.पिलीवसह परिसरातील ग्रामस्थ,शिक्षक,दुकानदार, ग्रामपंचायत कर्मचारी,शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा,गरोदर माता आदिंनी आपली टेस्ट करून घेणे व इतरांनाही टेस्टींगसाठी प्रवृत्त करणे.

गावातील खाजगी डॉक्टरांनी त्यांच्या OPD मध्ये येणार्या संशयित वाटणाऱ्या रुग्णांना समुपदेशन करून टेस्ट करण्यास सांगावे.असे अवाहन करण्यात आले आहे.टेस्ट करणार्या व्यक्तींनी आपले आधार कार्ड घेऊन यावे व आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व गावचे सरपंच,ग्रामसेवक,पोलीस पाटील,यांनी आपल्या गावातील व भागातील खाजगी डॉक्टर्सना संपर्क साधून टेस्टिंगसाठी जास्तीत जास्त लोक बोलवावेत.काही लोकांना काही चिन्ह लक्षणे नसतात परंतु ते positive असू शकतात त्यामुळे जास्तीतजास्त टेस्टिंग करणे अवश्यक असल्याचे डॉ.माने-देशमुख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *