लेखी अश्वासनानंतर उपोषणास स्तुर्तास स्थगिती कारवाई न झाल्यास पुन्हां जैसे थे – गौतम भंडारे
पिलीव/प्रतिनिधी
शासनाने महाराष्ट्रातील अनेक खाजगी रूग्णालये कोरोना रूग्णांसाठी ताब्यात घेतलेली असताना अकलूजमधील काही डॉक्टरांनी एकत्र येऊन १५ ऑगस्टनिमित्त एमटीडीसी या शासकीय इमारतीत कोव्हीड हॉस्पिटल सुरू केले. मात्र याठिकाणी जनतेची मोठ्या प्रमाणात लूट केली जात असल्याने या कथित गैरकारभाराची चौकशी करून त्याचा चौकशी अहवाल मिळावा व संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी पाक्षिक बंडखोरचे संपादक गौतम भंडारे यांनी उपसंचालक आरोग्य विभाग पुणे याठिकाणी काल दिनांक 24 सप्टेंबर रोजी उपोषणाला सुरूवात केली होती.

सदर उपोषणाची लागलीच दखल घेवून पुणे येथील आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय देशमुख यांनी सोलापुर जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकीस्तक यांना सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन अवाहल आपल्या स्वंयस्पष्ट अभिप्रायासह व आवश्यक त्या दस्ताऐवजासह दोन दिवसात सादर करण्याचे लेखी पत्रक काढल्याने व संबधितांवर कारवाई करण्याचे मला लेखी आश्वासन दिल्याने मी माझ्या उपोषणास उपसंचालक डॉ.संजय देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून स्तुर्तास स्थगिती देत असल्याचे उपोषणकर्ते संपादक गौतम भंडारे यांनी सा.माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.सखोल चौकशीनंतर संबधित डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास उपोषण पुन्हा जैसे थे सुरु राहील असे ही यावेळी भंडारे यांनी सांगितले.