पिलीव येथील नुकसानग्रस्त लोकांना भाजपा नेते के के.पाटील यांची मदत..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटी होऊन अचानक आलेल्या पाऊसामध्ये अनेकांचे संसार उपयोगी साहीत्य वाहून जाऊन संसार उघड्यावर पडले आहेत.

अशा नुकसानग्रस्त लोकांची परिस्थिती पाहणी करून सामाजिक बांधिलकी जपत फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदतीचा हात देण्यासाठी भाजपा नेते के के.पाटील यांनी आज मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी माळशिरस तालुक्यातील पिलीव गावातील नाईक वस्ती व दलित वस्ती येथील एकूण 500 पीडित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट देऊन आधार देण्यचे काम केले.या कीट मध्ये गहू तांदूळ साखर गुळ चहापुडा मसाल्याचे पदार्थ दाळी साबण तेलपुडा आदी वस्तु होत्या.सदर किट वाटपावेळी भाजपा नेते के के.पाटील,राहूल मदने,नाना मदने,ग्रा.पं सदस्य दत्ता बोडरे,जेष्ट पत्रकार दामोदर लोखंडे,संजय पाटील,प्रमोद भैस,शाहरुख मुलाणी,विजय सगरे,सदाशिव मदने,सुरज लोखंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
