डॉ.कुमार लोंढे व त्यांचे कुटुंब तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण करत आहेत – के के.पाटील
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील
चांदापुरी येथे नवभारत कृषी
सेवा केंद्र चे उदघाटन चांदापुरीकारखान्याचे* व्हा.चेरमन तालुक्याचे अभ्यासू नेतृत्व के के पाटीलआंबेडकरी चळवळीचेजिल्ह्याचे नेते* मा विकास दादा धाईंजे
चांदापुरी चे माजी सरपंच व संचालक मा.भजनदास चोरमले,युवक नेतृत्व मा विजय पाटील सोशल चे संस्थापक डॉ.कुमार लोंढे या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.सुरुवातीस नवभारत चे मॅनेजर प्रोप्रायटर लहू लोंढे यांनी प्रास्तविक केले यावेळी मनोगत व्यक्त करताना के के पाटील म्हणाले” कोणताही उद्योग व्यवसाय करत असताना सेवाभाव असणे महत्त्वाच आहे.तुमच्यावर लोकांचा विश्वास भरपूर आहे .तुमची जन्मभूमी व कर्मभूमी एकच आहे त्यामुळे शेतकरी वर्गास योग्य दरात खते,बी बियाणे उपलब्ध होतील व डॉ.कुमार लोंढे व त्यांचे कुटुंबीय तालुक्यात वेगळा आदर्श निर्माण करेल हा आशावाद त्यांनी व्यक्त केला.विकास दादा धाइंजे म्हणाले ” कोरोना सारखा आजार आल्यामुळे माणूस माणसात आला आहे जात,धर्म,पंथ या पलीकडे आपण भारतीय म्हणून जगले पाहिजे! कृषी केंद्र शेतकऱ्यांच्या
विश्वासास पात्र ठरेल.कुमार लोंढे यांनी चांदापुरी येथे वेगवेगळे उपक्रम सुरू करून एक आदर्श निर्माण केला आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष भजनदास चोरमले म्हणाले ” मुलांना शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी पाहिली ते बारावी शाळा सुरू आहे,पिलिव येथे बँक सुरू आहे.लोकांना आरोग्य सेवेसाठी हॉस्पिटल आहे आणि शेतकरी बांधवांना कृषी केंद्र च्या माध्यमातून सर्व खते औषधे मिळणार आहेत.परिस्थितीस दोष देण्यापेक्षा त्यावर आरूढ होणारा व्यक्ती यश प्राप्त करतो असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
सदर कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन लोंढे,रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष किरण धाईंजे,माळशिरस तालुका अध्यक्ष नरेंद्र भोसले,सरचिटणीस मिलिंद सरतापे,युवा उद्योजक भैय्या साहेब बाबर,रणजित सरवदे,माजी उपसरपंच शशी साळवे,शिवाजी देठे, आण्णा भोसले,अरुण बोडरे, दिघची चे श्रीरंग शिंदे, अशोकराजे देशमुख ,सदाशिव देठे प्रशाला कॉलेजच्या सचिवा डॉ. पंचशिला लोंढे ई मान्यवर उपस्थित होते.
नवभारत खते वापरून विक्रमी उत्त्पंन घेणारे सलीम अतार,शंकर मगर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.कुमार लोंढे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता अमोल लोंढे,अंकुश लोंढे,दादा लोंढे, समीर साबळे,सूरज मोरे,गणेश धोत्रे ई नी परिश्रम घेतले.