नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी – आ.राम सातपुते
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरामध्ये सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे पिलीव जिल्हा परिषद गटांमधील सर्वच गावातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.हाता तोंडाला आलेली पिके या जोरदार पावसामुळे जमीनउध्वस्त झाली आहेत तर अनेक गोर-गरीब लोकांची घरे पडली आहे.त्यामुळे प्रत्येक शेतकरी हवालदिल होऊन कोलमडला आहे.

तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत पंचनामे करावे व प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सरकारने हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी व ज्यांची घरे पडली आहेत त्यांनी घरे बांधून ध्यावी किंवा आर्थिक मदत करावी अशी मागणी माळशिरस तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार राम सातपुते यांनी माध्यमांशी बोलताना केली.सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे नुकसान झालेल्या भागांमध्ये आमदार सातपुते यांनी 24 तासाच्या आत भेट देऊन पाहणी करुन मदत मिळवून देण्याचे अश्वासन दिल्याने कोलमडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.यावेळी प्रमोद भैस यांच्या घराकडे जाणारा मुरमीकरण केलेला रस्ता वाहून गेला आहे याचीही पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना रस्ता पूर्ववत करण्याच्या आमदार सातपुते यांनी सूचना दिल्या आहेत.
दिनांक 16 सप्टेंबर रोजी राघवेंद्र उर्फ बाळासाहेब खरे यांचा शिगोर्णी येथील ओढ्यामध्ये वाहून गेल्याने मृत्यू झाला असल्याने खरे कुटुंबाची आ.सातपुते यांनी सांत्वनपर भेट घेतली व खरे कुटुंबाला आर्थिक स्वरुपाची शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.सातपुते यांनी सांगितले.यावेळी पिलीव गावचे सरपंच नितीन माळी,तलाठी जाधव,पिनू कदम,शिवराज पुकळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.