गुरसाळे येथील बेजबाबदार कृती समिती व दक्षता समितीवर गुन्हा दाखल करा – आप्पासाहेब कर्चे

नातेपुते/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील गुरसाळे येथे ३ जूलै रोजी कार्यक्रमासाठी पुणे वरून आलेले दोन रुग्ण १० जूलैच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह सापडल्याने १० जुलैपासून गुरसाळे गाव संपूर्ण बंद केले (गावात येणारा प्रमुख जिल्हा मार्ग, मेन रस्ता अंतर्गत रस्ते बंद केले आहेत) सदर गाव बंद असल्याने गावातील गोरगरीब मजूरी करणाऱ्या लोकांचे जीवनावश्यक वस्तू विना हाल होत आहेत लहान मुले वृद्ध लोकांची भूकेविना खूप हाल चालले आहेत गावातील कृती व दक्षता समितीतील कोणीही याचा अद्याप विचार केलेला नाही काही जीवनावश्यक वस्तू आणायला बाहेर जावे तर पोलीस बाहेर पडू देत नाहीत दुकानेही बंद आहेत चूक कुणाची सजा कुणाला कृती समितीने दुर्लक्ष केल्यामुळे बाधित रूग्ण पुण्यावरून राजरोसपणे गावात आले आलेल्या बाधितांनी कृती व दक्षता समितीच्या बेजबाबदारपणामुळे चूक केले आणि पूर्ण गुरसाळे गावाला हाल सोसावे लागत आहे याला सर्वस्वी जबाबदार कृती समिती व कृती समितीतील सरकारी कर्मचारी आहेत यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माढा लोक सभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी उपविभागिय अधिकारी अकलुज यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असून निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंञी पालक मंञी जिल्हाधिकारी यांना पाटविल्या आहेत निवेदनामध्ये फुढे म्हटले आहेकी ३ जूलै रोजी पुणेहून गुरसाळे येथे आलेले बाधित पेशंट यांना कृती समितीने वेळेस रोखले असते व विलगीकरण करूण ठेवले असते तर ही वेळ गुरसाळे गावावर आली नसती व प्रशासनाला काम लागले नसते परंतु कृती समितीतील सरकारी कर्मचारी मुख्यालयात तर राहतच नाहीत परंतु आणीबाणीच्या काळात सुद्धा वेळेवर कामावर येत नाहीत व गावात काय चालले याकडे लक्ष देत नाहीत त्याचाच हा परिणाम आहे.


३ जुलैला गुरसाळे गावातील वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला कोरोना बाधित रूग्ण पुणे वरून कार्यक्रमासाठी आले व कार्यक्रमात भाग घेऊन आणि कार्यक्रमाच्या भजनी मंडळ व आलेल्या ग्रामस्थांच्या कपाळाला सदर बाधित व्यक्तीने बुक्का लावला कार्यक्रम दोन ते तीन तास चालला सदर बाधित व्यक्ती कार्यक्रमानंतर तब्येत बरी नसताना गावात व इतरत्र फिरला नातेपुते येथेही खासगी डॉक्टर चंकेश्वरा कडे जाऊन आल्याचे समजते तीन जुलै ते पाच जुलैच्या दरम्यान सदर व्यक्ती गावात फिरला नातेपुते येथे जाऊन आला सहा जुलैला त्या बाधित व्यक्तींना कोविंड सेंटरला नेण्यासाठी उचलले तोपर्यंत ते पेशंट गुरसाळे गावातील व इतरत्र पाहुणेरावळे मित्रमंडळी यांच्या संपर्कात आला असल्याचे समजते तीन जुलैच्या कार्यक्रमाला बाधित व्यक्ती पुणे वरून येत असताना त्याला गावातील कृती समितीतील एकानेही का हटकले नाही नंतर सदर बाधित व्यक्ती कार्यक्रमाला सामील होतोय कार्यक्रमात हिरारीने भाग घेऊन कार्यक्रमातील भजनी मंडळ व इतर लोकांना बुक्का लावतोय कार्यक्रमही रोडच्या कडेला आरोग्य उप केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यालगत होत असताना आरोग्य सेवकाने मुद्दामहून दुर्लक्ष का केले कृती समितीतील लोक झोपी गेले होते काय का मुद्दाम गावाला वेटीस धरण्यासाठी कृती समितीतील लोकांनी दुर्लक्ष केले याची चौकशी झालीच पाहिजे दिनांक ३ जूलै ते ५ जुलै कृती समितीने का नाही सदर बाधित व्यक्तींना रोखले सदर कृती व दक्षता समितीचे नेमके काम काय आहे गावात कोरोना पसरू द्यायचा का पसरू नये म्हणून प्रयत्न करायचा तरी आज गुरसाळे गाव संपूर्ण बंध आहे गावातील लोकांचे हाल होत आहेत कृती समिती मुळे हे झाले आहे त्यांनी वेळीच सदर बाधित पेशंटला रोखले असते तर ही वेळ आली नसती तरी गुरसाळे येथील कृती व दक्षता समितीतील एकही सरकारी कर्मचारी मुख्यालयात म्हणजे गुरसाळे गावात राहत नाही तर काही कर्मचारी पर जिल्ह्यातून गावात काम करण्यासाठी येत आहेत गावात पुणे मुंबई वरून कोण आले कोण गेले याचे काहीच कृती समितीला देणेघेणे नाही तरी आणीबाणीच्या वेळी सुद्धा येथील ग्रामसेवक आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,पालक, गावात राहतच नाहीत पोलीस पाटीलही गावात पुणे मुंबई वरून कोण आले याची माहिती घेत नाहीत वरील शासनाचा पगार घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाच्या आदेशाचे पालन केले नाही नेहमीप्रमाणे त्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भाव काळातही गावात लक्ष दिले नाही मुख्यालयात राहत नाहीत तरी त्यांच्यावर शासकीय नियमांचे पालन न करणे मुख्यालयात न राहणे गावात कोरोना रोगाच्या काळात लक्ष न देणे यांच्यामुळेच गावाला आज त्रास सहन करावा लागत आहे तरी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत अन्यथा आम्ही मनसे स्टाइलने प्रांत कार्यालयासमोर फिजिकली डिस्टन्स पळून उपोषणास बसणार असल्याचे आप्पासाहेब कर्चे यांनी निवेदनात म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *