सुळेवाडी येथे सहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार कोण आहेत ते नराधम वाचा सविस्तर..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील सहा वर्षीय चिमुरडीवर दोन नराधमांनी अत्याचार केला व या बाबत पोलीसात तक्रार करण्यासाठी जात आसताना तवेरा गाडीत पाच जनांनी आडवुन पिडीतेच्या आई -वडीलांना मारहान केल्याची तक्रार माळशिरस पोलीसात दाखल झाली आहे.पोलीसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आसुन त्यांना न्यायालयात उभे केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.सदर घटनेची पोलिस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहीती अशी की पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीत दोन मुले. मि , पती व सासु सासरे असे कुटुंब राहत आहे पती कॉरंटाईन असल्यामुळे शेतात राहायला होते.तर सासु सासरे मेंढ्या राखण्यासाठी शेतात गेले होते.मी गवत आणण्यासाठी शेतात गेली होती.शेतातून गवत घेऊन घरी येताच घरासमोर मोटारसायकल उभी असल्याचे दिसले.व खोलीतुन मुलीच्या रडण्याचा आवाज येत आसल्याने मी गवताचे ओझे खाली टाकून खोलीमध्ये गेले असता आरोपी शिवाजी महादेव सुळे याने माझ्या मुलीचे दोन्ही हात धरले होते तर आण्णा गेजगे हा माझ्या मुलीवर अत्याचार करीत होता. यावेळी मी आरडा-ओरडा केला असताना दोन्ही आरोपींनी पळ काढला यानंतर मी व माझे पती मुलीला घेऊन पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असताना दोन किलोमीटर अंतरावर MH 04 E F 7494 या तवेरा गाडीत येऊन आम्हाला आडवून तुम्ही पोलिसात जाऊ नका आपण परस्पर हे प्रकरण मिटवू ते माफी मागायला तयार आहेत असे सांगितले परंतु आम्ही तक्रार देण्यावर ठाम असल्याने अण्णा गेजगे,विश्वास लोखंडे,शिवाजी महादेव सुळे,जाबर माने,नवनाथ सुळे यांनी पीडितेच्या वडिलांना मारहाण सुरू केली.म्हणून मी आरोपींना प्रतिकार केला त्यावेळी मला ही मारहान केली.अशा आशयाची तक्रार पिडीतेच्या आईच्या नावे माळशिरस पोलीसात दाखल करण्यात आली.सदर प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार आहेत आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू हे करीत आहेत.