अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मेघाराणी देवकर हिचे उत्तुंग यश…!
पिलीव/प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून व डॉ प्रभाकर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील भाषा व वांड्मय संकुलाच्या वतीने ऑनलाइन कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील वक्तृत्व स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले.या स्पर्धेमध्ये डॉ दत्ता घोलप, प्रा विजयकुमार झोंबरे , प्रा आयेशा पठाण प्रा शोभा बोल्ली,प्रा ममता बोल्ली, प्रा श्रुती देवळे आदींनी परीक्षक म्हणून काम पाहिले व त्यांच्या परीक्षणातून आणि श्रोत्यांच्या पसंतीतून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या 3 क्रमांकामध्ये कुमारी मेघाराणी रघुनाथ देवकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला व वक्तृत्व स्पर्धेतील यशाच्या मालिकेची परंपरा कायम राखली. या यशामध्ये तिला प्रा डॉ चांगदेव कांबळे , प्रा आतिश धेंडे व सोलापूर विद्यापीठाचा स्टाफ , कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव, मातोश्री शोभा देवकर , कुसुमताई जाधव व प्रा कल्पना सातपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या सततच्या यशाबद्दल पिलीव पत्रकार संघ , श्री राम गणेश मित्र मंडळ व श्रीराम दुर्गा माता मंडळ पिलीव विविध संस्थाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.