जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या वायरमन व वीज तांत्रिकाना 50 लाखाचा विमा कवच देणे गरजेचे – डॉ.कुमार लोंढे

पिलीव/सुजित सातपुते

आज देशात सह राज्यांमध्ये कोरोनाचा कहर सुरू असताना वादळी वारा, पाऊस, गारपीट आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर विजेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे या सर्व परिस्थितीमध्ये वायरमन वीज तांत्रिक कामगार बांधव आपल्या जीवाची बाजी लावून या सर्व परिस्थितीशी सामना करत आहेत . रात्री-अपरात्री रानात-वनात जीव धोक्यात घालून तुम्हाला उजेडात ठेवण्यामध्ये स्वतः अंधारामध्ये तारेवरची कसरत करत असतो तो म्हणजे वायरमन, वीज तांत्रिक कामगार होय.

त्यांच्यामुळे  आपण उजेडात आहे आणि ते  अंधारात राहतील हे बरोबर नाही . त्यांच्या  जीवाची हमी  संकट समयी राज्य सरकारने घेणे महत्त्वाचे आहे. त्यांना 50 लाखाचा विमा कवच मिळणे गरजेचे आहे

 पिलीव  सब स्टेशनचे मा.मिसाळ साहेब त्यांची संपूर्ण टीम व  तांत्रिक कामगार अनिल मोहन बाबर हे अतिशय उत्कृष्ट काम करताना आपणास फोटोत दिसत आहेत.हा युवक ट्रॅक्टर व जेसीबी च्या साह्याने तारा तुटू नये म्हणून खबरदारी घेत आहे अशा सर्व महाराष्ट्रातील तांत्रिक, वीज जोडणी कामगारांना 50 लाखाचा विमा कवच महत्वाचे आहे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सेंट्रल ह्यूमन राईट संघटनेचे डॉ.कुमार लोंढे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री डॉ.नीतीन राऊत यांचेकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *