पिलीव येथील रयत शिक्षण संस्थेचे सेवक दिलीप काळे यांचा निरोप समारंभ अत्यंत साधेपणाने साजरा..!
पिलीव/सुजित सातपुते
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विध्यालय पिलीव या ठिकाणी सेवक पदावर कार्यरत असलेले मा.श्री दिलीप गजानन काळे हे दिनांक ३१-५-२०२० रोजी सेवानिवृत्त होत आहेत.त्यांनी रयत संस्थेमध्ये ३३ वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली आहे.त्यांचा निरोप समारंभ कोरोनाचे महाभयंकर संकटामुळे अत्यंत साध्या पद्धतीने घरगुती वातावरणात अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. दिलीप काळे यांचा सत्कार डॉ.दिलीपराव पवार यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला.यावेळी विजय धायगुडे सर,प्रकाश जाधव,सचिन गाटे,पद्मीनी धायगुडे,माने मॅडम,औटी मॅडम,माधुरी काळे,आदिती, आशीष व इतर मान्यवर उपस्थित होते. सचिन गाटे यांनी प्रास्ताविक करून विध्यार्थीदशेत आलेले अनुभव सांगितले. त्यांच्या भगिनी सौ काळे मॅडम यांनी काळे सरांच्या जीवनातील आठवणी सांगितल्या. शेवटी आभार प्रदर्शन काळे सरांचे मेहुणे शिरीष राऊत यांनी मानले.शेवटी शिरीष राऊत परिवाराकडून उपस्थित सर्व मान्यवरांना चहा व अल्पोपाहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.