ग्रा.पं सदस्य जिवन गुरव यांच्याकडून ग्रा.पं कर्मचाऱ्यांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप…!

पिलीव/सुजित सातपुते
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रदूर्भाव लक्षात घेता कोरोना विरोधात लढताना सर्वसामान्य लोकांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जीवन(दादा)गुरव यांनी स्वखर्चाने पिलीव मधील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे किराणा मालाचे किट वाटप केले व सर्व कर्मचारी यांना मास्क,सॅनिटायझर व हँड ग्लोज ही देण्यात आले.यावेळी जीवन दादा गुरव,जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे, संजय पाटील,प्रमोद भैस,सुजित सातपुते,शुभजीत नष्टे ,शाहरुख मुलाणी, ऋषिकेश देशमुख उपस्थित होते.यावेळी जिवन गुरव यांनी मी चार नंबर वार्डातील गरीब व गरजू कुटूंबांना आणखी किराणा मालाचे वाटप करणार असल्याचे सांगितले.