पिलीव पोलिसांची कामगिरी : संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या दहा जणांना घेतले ताब्यात..!
पिलीव/सुजित सातपुते
कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने याला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा करून नागरिकांना घरात थांबण्यास आवाहन केले आहे.

दरम्यान लोकांनी घरात रहावे यासाठी संचारबंदीही पुकारली असताना नागरिक काही केल्या घरात थांबण्यास तयार नसून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत फिरत असताना माळशिरस तालुक्यातील पिलीव पोलिसांनी बुधवार दि.8 एप्रिल रोजी पिलीव परिसरामध्ये मोकाट फिरणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर मुंबई पोलिस अधिनियम कलम ६८ नुसार कारवाई केली असून त्यांच्या मोटार सायकल जप्त केल्या आहेत.उद्या गुरुवार दि.9 एप्रिल पासून तर पिलीवसह परिसरामध्ये पोलिस प्रशासन कारवाई अधिक तीव्र करणार असल्याचे पिलीव पोलिसांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.सदरची कामगिरी पोनि विश्वंबर गोल्डे व पोउनि अदिनाथ महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी पराडे,सुधीर गोडसे,स्वप्निल गायकवाड,दत्तात्रय खरात,सतीश धुमाळ व तलाठी अतुल अल्लेवार यांनी पार पाडली.सदरच्या कारवाईने पिलीव परिसरामध्ये मोकाट फिरणार्यांना चाफ लागणार हे मात्र नक्की..!