आरोग्य मंत्र्याच्या हाकेला पिलीवकरांची साद : उद्या खरात क्लिनिक येथे होणार भव्य रक्तदान शिबीर..!
पिलीव / प्रतिनिधी
आरोग्य मंत्री श्री.राजेश टोपे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरातील ग्रामस्थांच्यावतीने उद्या रविवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 8:00 ते 3:00 या वेळेत डॉ.खरात यांच्या खरात क्लिनिकमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक तथा LIC चे विमा प्रतिनिधी अशोक बगाडे व कुसमोड गावचे माजी सरपंच महावीर धायगुडे यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.या शिबीरामध्ये पिलीव परिसरातील सर्व मान्यवर,तरूण कार्यकर्ते,जिगर ग्रुप,पिलीव परिसरातील विविध गणेश मंडळे,विविध संस्था,सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत ही सर्व तरुण पिढी
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी तयार आहे.तर गावातील व पंचक्रोशीतील सर्वांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे.महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून रक्ताची मागणी खूप वाढत आहे त्यामुळे आपण हा उपक्रम हाती घेतला असल्याचे आयोजकांनी सांगितले.तर सांगोला येथील रेवनील ब्लड बँक ही संस्था आपल्या डॉक्टरमंडळी व सर्व स्टाफसह हजर राहणार आहे.व रक्तदान करण्यासाठी पोलिस प्रशासनही सहकार्य करणार आहे.तरी सर्वांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे व जेष्ठांनी उपस्थित राहून तरुणांना रक्तदान करण्यासाठी प्रेरणा द्यावी असे माळशिरस टाईम्सच्या माध्यमातून सुचित करुन आयोजकांनी अवाहन केले आहे.