पिलीव येथील किराणा व भुसार मालाचे नामांकीत व्यापारी प्रशांत गांधी यांचे कोरनावर मात करण्यासाठी शिस्त बध्द नियोजन…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे पिलीव-पंढरपूर रोडवरती प्रशांत गांधी यांचे भव्य दिव्य असे मे.चंद्रकांत जिवराज गांधी या नावाने किराणा व भुसार मालाचे अनेक वर्षापासून मोठे दुकान आहे.याच दुकानामध्ये प्रशांत गांधी यांनी अतिशय शिस्त बद्ध नियोजन करत 4 फूटावर चौकोन मारत ग्राहकांना उभा राहता यावे अशी व्यवस्था उभी केली असून आपले दूकान शासनाच्या आदेशा प्रमाणे चालू ठेवले आहे.त्यामुळे हा ऊपक्रम अतिशय चांगला व कोरोना संसर्गा पासून दूर ठेवणारा असल्याने गांधी यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.पिलीवसह परिसरातील सर्वच दुकानदारांनी प्रशांत गांधी यांचे अनुकरण केले तर नक्कीच आपण कोरोना विषाणूचा वाढता प्रदुर्भाव रोखू शकतो असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.
