बँक अधिकारी असल्याचे भासवून चांदापुरीच्या युवकाची तोतया इसमाकडून फसवणूक..!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी (पठाण वस्ती) येथील आमिरखान जरीफखान पठाण या तरुणाची बँक अधिकारी बोलत असल्याचे भासवून बँक खात्याची माहिती मिळवून एकूण 45 हजार 998 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.सदर प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की आमिरखान पठाण यांना 9123637613 या क्रमांकावरून फोन आला व मी बँक अधिकारी मनिषकुमार नामक बोलतोय तुमच्या खात्यातील रक्कम सुरक्षित रहावी व तुमची फसवणूक होऊ नये म्हणून आम्हाला खबरदारी घ्यावी लागत आहे.असे सांगून मनिषकुमार नामक या तोतया इसमाने माझी बँक डिटेल जाणून घेतली व आकलुज येथील इस्कीटास बँकेतील माझ्या खात्यातील 45 हजार 958 रुपये एवढी रक्कम काढून घेतली असल्याचे पठाण यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.त्यामुळे नागरिकांनी सध्या सतर्क राहणे गरजेचे आहे कोणत्याही अनोळखी इसमाला फोनवरुन अथवा समोरा-समोर बँकेची माहिती देवू नका अन्यथा एक पर राज्यातील तोतया इसम आपलाही पोपट बनवेल हे मात्र नक्की..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *