मंथन परिक्षेत जि.प लक्ष्मी नगर शाळेचे दैदिप्यमान यश..!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील जि.प लक्ष्मी नगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मंथन परिक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.यामध्ये इयत्ता तिसरी मधील कु.सानीका विजय लेंगरे हिने 300 पैकी 280 गुण मिळविले तर कु.तनीषा देवीदास पाटील हिने 300 पैकी 256 गुण मिळविले या दोन्ही विद्यार्थ्यांनीना मुख्याध्यापक सुहास कोल्हे व सुनील डुरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांनी व मार्गदर्शक शिक्षक यांचे माळशिरस पं.स गटशिक्षणाधिकारी देशमुख साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी नकाते साहेब,केंद्रप्रमुख फासे सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवीदास पाटील,माजी उपसरपंच व पत्रकार संजय पाटील,तसेच शाळा व्यवस्थापन समिती आजी माजी सदस्य,पदाधिकारी,पालक,ग्रामस्थ यांच्या कडून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *