डॉ.वैभव बागल यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी – ॲड.सुमित सावंत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी..!
माळशिरस/सुनिल ओवाळ
सध्या देशात कोरोना विषाणुमुळे वैद्यकिय क्षेत्रात अतितत्परता जाहीर असल्याने या क्षेत्रातील डाॕक्टर्ससह सर्व यंत्रणांनी स्व – सुरक्षेसह, तत्पर व सक्षमपणे जागृक राहुन कर्तव्य बजावण्याचा शासनाचा सक्त आदेश असताना ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर बागल यांनी मात्र हा आदेश बासनात गुंडाळुन ठेवल्याने रूग्णांसह,नागरीकांतुन याबद्दल तिव्रचिंता व्यक्त होत होती.त्यामुळेच अॕड.सुमित सावंत यांनी डॉ.वैभव बागल यांचीमुजोरी थांबविण्यासाठी यांच्यावरती कायदेशीर कारवाईची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अॕड.सावंत यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले की , स्वतः सुमित सावंत हे गेले काही दिवस आजारी असल्याने दि. २६ मार्चपासून ते ३१ मार्च पर्यंत,सदर डॉक्टरांच्या सल्ल्याने ते उपचार घेत आहेत, परंतु उपचारादरम्यान प्रकृतीत काही सुधार न झाल्याने पुन्हा दि.२ मार्च रोजी ते दवाखान्यात डॉक्टर कडे उपचारासाठी गेले असता तेथे डॉ.बागल त्यांचे निर्धारीत वेळेत कर्तव्यावर उपलब्ध नसल्याने त्यांनी वारंवार तेथील उपस्थित कर्मचाऱ्यां मार्फत डॉक्टरांना निरोप दिला, दरम्यान दवाखान्यामध्ये वयोवृद्धांची गर्दी झाली होती.या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्स चा नियम पाळला जात नव्हता.डाॕ.बागल १०;३० वाजता आले,नंतर वयोवृद्धांना तपासणी करताना लांबूनच विचारपूस करून गोळ्या दिल्या जात होत्या .त्यां रूग्णांना रक्तदाबासह, टेथिस्कोपव्दारे तपासणी होतच नाही.तसेच वयोवृद्ध रुग्णांना उर्मटपणा ची भाषा वापरली जात होती तशाच पद्धतीने ॲड. सुमित सावंत यांना सुद्धा डॉक्टरांनी उर्मटपणे वागणूक दिली व रुग्णालयातून निघुन जा असे सांगुन काय करायचे आहे ते कर असे मुजोरपणे उत्तर दिले. सध्या देवत्वाचा दर्जा मिळालेले डाॕ.बागल यांसारखे ‘ वैद्य ‘ गैरफायदा घेऊन हरताल फासत आहेत.मात्र हा वर्तमान परिस्थिती गंभीर बनविण्याचा धोका वाढविणारा प्रकार वेळीच थांबावा डाॕ.बागल यांची मुजोरी बंद व्हावी .यासाठी
सुज्ञ नागरीकांचे विनंतीवरून अॕड.सुमित सावंत यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य संचालक मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.