त्या दोन पेट्रोल पंप चालकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे- आप्पासाहेब कर्चे

नातेपुते/प्रतिनिधी
संपूर्ण जगात कोरोना चा हाहाकार माजल्यामुळे त्याला प्रतिबंध व्हावा म्हणून आपल्या देशात राज्यात सर्वत्र जनता कर्फ्यू लोक डाउन संचारबंदी सोशल डिस्टन्स अशा अनेक कायद्यांच्या आधारे बंधने घालून कोरोना चा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन आपल्या परीने अमाप कष्ट करीत आहे परंतु काल दिनांक 01:04 2020 रोजी मौजे नातेपुते येथील दोन्ही पेट्रोल पंपा वरती अचानक सर्वसामान्य लोकांना पेट्रोल-डिझेल देणे चालू केले वरिष्ठांचे आदेश होते फक्त जीवनावश्यक सेवेसाठी पेट्रोल-डिझेल देण्यात यावे पण अचानक या दोन्ही पंपांना कोणाचे आदेश आले कि काय झाले त्यामुळे त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक पेट्रोल-डिझेल अमाप प्रमाणात देण्यास चालू केले त्यामुळे दोन्ही पंप आवडती प्रचंड गर्दी जमा झाली लोकं एकमेकांना फोन करून गर्दी वाढायला लागली त्या गर्दीला योग्य ते अंतर देऊन पेट्रोल द्यायला पाहिजे होते.

परंतु तसे कुठलेही नियोजन स्थानिक समिती पेट्रोल पंप मालक व्यवस्थापन कामगार यांचेकडून झालेले दिसत नव्हते हे लोकं झुंबड झुंबड एकत्र होते तसेच गावामध्ये अनेक ठिकाणी संचार बंदी असल्यामुळे नाकाबंदी चालू आहे त्या नाकाबंदी मधून अनेक लोक येत जात होते पोलिसांनी त्यांच्याकडे कोणतीही चौकशी केली नाही त्यामुळे गर्दी वाढली व कोरना सारख्या रोगाला वाढीसाठी एक संधी निर्माण झाली त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या तालुक्याचे तहसीलदार यांना पत्र देऊन संबंधित पेट्रोल पंप चालक व्यवस्थापक कामगार नाका-बंदी करणारे पोलीस प्रशासन स्थानिक समिती यांच्यावरती त्वरित कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *