तालुक्यातील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची पदे भरण्याची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्या यांच्याकडे मागणी..!


माळशिरस प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागांतर्गत असणाऱ्या बारा प्राथमिक आरोग्य केंद्र तीन ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक रिक्त पदे आहेत असल्याने त्वरित भरण्याची मागणी माळशिरस तालुका पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्याकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे
माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तालुक्यातील आरोग्य विभागातील विविध रिक्त पदाची व औषधाचा साठा जादा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे
या निवेदनात म्हटले आहे की सध्या राज्यात कोरोनो व्हायरसने थैमान घातले आहे यातून आपण जनतेला सहीसलामत बाहेर काढणार आहातच त्यामुळे सक्षम आरोग्य सेवा चांगली करण्यासाठी या मागण्यांचा विचार करावा तसेच माळशिरस तालुक्यामध्ये 12 प्राथमिक आरोग्य केंद्रात 76 आरोग्य उपकेंद्र असून अनेक ठिकाणी ही पदे रिक्त आहेत आरोग्यसेवक 41,आरोग्य सेविका 45,आरोग्य सहाय्यक 3,आरोग्य सहायिका 8, कनिष्ठ सहाय्यक 4 ,औषध निर्माते 1 ,परिचर 23
अकलूज उपजिल्हा रुग्णालय – 1 वैद्यकीय अधीक्षक,1 फिजिशियन,1आयुष डॉक्टर ,3 स्कुल हेल्थ डॉक्टर 3,स्टाफ नर्स , 2औषधनिर्मता(RBSK),1
क्ष-किरण तंत्रज्ञ ,1 प्रयोगशाळा तंत्रज्ञ,4 सफाई कामगार
नातेपुते ग्रामीण रुग्णालय-1 वैद्यकीय अधीक्षक,1 वैद्यकीय अधिकारी,1 आयुष डॉक्टर ,1 स्कुल हेल्थ डॉक्टर , 1 क्ष-किरण तंत्रज्ञ ,1 प्रयोगशाळा तंत्रज्ञ,1औषधनिर्मता , सफाई कामगार ,गाडी व ड्रायव्हर नाही
माळशिरस ग्रामीण रुग्णालय – 1 वैद्यकीय अधीक्षक,1 वैद्यकीय अधिकारी ,1आयुष डॉक्टर , 2 स्कुल हेल्थ डॉक्टर,1औषधनिर्मता, 1 प्रयोगशाळा तंत्रज्ञ,सफाई कामगार,ड्रायव्हर नाही तालुक्यात आरोग्य विभागात रिक्त पदे आहेत तसेच अनेक ठिकाणी गोळ्या औषधाची कमतरता भासू लागली आहे तरी तो लवकर उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *