माळशिरस तालुका NDMJ च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन..!
पिलीव/प्रतिनिधी
उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलुज यांना कोरोना संदर्भात व जीवनावश्यक वस्तुंची काही होलसेल व्यापारी चढ्या दराने विक्री करत असल्याने माळशिरस तालुका NDMJ च्या वतीने खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले.

1) उज्ज्वला गॅस सिलिंडर चे मोफत वितरण त्वरीत करण्याचे आदेश संबंधीत गॅस एजन्सीना देण्यात यावे.
2) केंद्र सरकार व राज्य सरकारने आदेश दिल्याप्रमाणे रेशन कार्ङ धारकांना व कार्ङ नसणारे यांना त्वरीत धान्य मोफत देण्यात यावे.
3) ङाॅक्टर , नर्स ,आशा वर्कर ,अंगणवाङी सेविका यांना सर्व्हे करीत असताना सुरक्षतेसाठी सॅनेटायजर, मास्क ,ग्लोज ,साबण आदि वस्तुंचा त्वरीत पुरवठा करण्यात यावा. 4)आशा वर्कर यांचा 25 लाखाचा विमा काढण्यात यावा.
5)भाजी मंङईमध्ये भाजीपाला व इतर वस्तु चढ्या भावाने विकल्या जात आहेत ,त्याना समज देण्यात यावी.
6)मळणी मशिन मालकांकङून शेतकरी यांची एकरी गहू काढणीसाठी 3000 रूपये घेऊन लूट केली जात आहे तरी त्याच्यावर कङक करवाई व्हावी 7) ग्रामपंचायत स्तरावर दलीतवस्ती सुधारणा 15% टक्के निधीतुन प्रत्येक गावात अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप व्हावे 8) गरीब व गरजू लोकांना राज्य शासनाने केलेल्या जीवनावश्यक वस्तुचे वाटप व्यवस्थीत होते की नाही यासाठी ग्रामस्तरावर कमीटी स्थापन करावी.या व अशा विविध मागण्यांचे NDMJ च्या वतीने निवेदन देण्यात आले.या निवेदनावर माळशिरस गावचे माजी सरपंच विकासदादा धाईंजे, एन ङी एम जे राज्य सचीव वैभव गीते , ङि के कांबळे , प्रमोद शिदे नवनाथ भागवत, आदिंच्या सह्या आहेत.