माळशिरस पोलिसांनी उचला कारवाईचा बडगा : काही जनांवर गुन्हे दाखल,काहींना चोप तर काहींना उठाबशा…!

पिलीव/सुजित सातपुते
कोरोना  विरुद्धच्या लढ्यात माळशिरस पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून गेल्या दोन दिवसात लोकांना एकत्र जमून सार्वजनिक उपद्रव करून व बेदरकारपणे मानवी जीवितास व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरवण्याचे हायगायीची व घातक कृती करून  जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या  रोग प्रतिबंधक कायदा कलम 2, 3, 4 राष्ट्रपती आपत्ती व्यवस्थापन कायदा 51 ब अन्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे अवज्ञा केल्याच्या कारणास्तव अक्षय पाटील ,हसन  मुलानी ,महेश कापरे सर्व राहणार माळशिरस तर सदाशिवनगर येथील महादेव वाघमोडे व शंकर वाघमोडे या दोन पैलवानावर  माळशिरस पोलिसात गुन्हे दाखल  करण्यात आलेले असल्याची माहिती माळशिरस पोलिसांनी दिली. पोलीस पथकाने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकां चोप देत  कारवाईचा जोरदार  बडगा उगारला असल्याने माळशिरस शहरात निरव शांतता व शुकशुकाट झाला असल्याचे पहावयास मिळत आहे.

चौकट – दिवसेंदिवस कोरोनो च्या बाबतीत गंभीरता वाढत असल्यामुळे नागरिकांच्या रक्षणार्थ पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे.पुढील सूचना येईपर्यंत नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये.सूचनांचे योग्यरीतीने पालन करावे नागरीकांनी घरातच थांबुन प्रशासनाला सहकार्य करावे.अन्यथा विनाकारण रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी येणार्‍या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
पो.नि विश्वंभर गोल्डे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *