मनसे करणार महसूलच्या विरोधात थाळीनाद आंदोलन- आप्पासाहेब कर्चे

पिलीव/प्रतिनिधी
मौजे नातेपुते येथील गट नंबर 265 मधील फेरफार क्रमांक 67 10 प्रांताधिकारी यांनी अपिला मध्ये रद्द केला 2016 ला त्यानंतर 2017 मध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांनी प्रांत यांचा आदेश कायम करत अपील अमान्य केले त्यानंतर 2018 मध्ये अप्पर आयुक्त पुणे यांनी िल्हाधिकार्‍यांचा आदेश कायम करत अपील अमान्य केले वरील वरिष्ठांचे तिन्ही आदेश नातेपुते येथील मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आजपर्यंत त्याची दखल घेतली नाही उलट त्या शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावले हे सर्व प्रकरण चालू असताना त्यामध्ये अनेक खरेदी-विक्री व्यवहार झालेले आहेत त्यांच्या नोंदी 67 घेतल्यानंतर घ्यायला पाहिजे होत्या परंतु आर्थिक लालसेपोटी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून सर्व नोंदी धरून घेतल्या त्यामुळे आज त्यांच्या समोर 67 10 रद्द करताना बाकीच्या नोंदी रद्द कराव्या लागत आहेत हे सर्व गोड बंगाल हाणून पाडण्यासाठी व वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणार यांवर कठोरात कठोर कारवाई तसेच दप्तर दिरंगाई अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या 18 तारखेला प्रांत ऑफिस अकलूज यांच्यासमोर थाळीनाद आंदोलन करणार आहे तरी सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे अहवान मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी केले आहे


चौकट = नातेपुते येथील मंडल अधिकारी व तलाठी यांचेवर गुन्हे दाखल करा दप्तर दिरंगाई कर्तव्यात कसूर वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणे या सर्व गंभीर प्रकाराची दखल घेऊन गुन्हे दाखल झालेच पाहिजेत आप्पासाहेब कर्चे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *