मुलीच्या वाढदिवसानिमित्त पिलीव येथील देशमुख परिवाराचा नाविण्यपुर्ण उपक्रम…!
पिलीव/सुजित सातपुते
सध्या जगामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असुन यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेक सामाजिक संस्था व विविध संघटना काम करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.याच अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील उमेश देशमुख यांनी कर्मवीर विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिकत असणार्या आपल्या मुलीच्या म्हणजेच सई उमेश देशमुख हिच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर विद्यालयतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीना मोफत मास्कचे वाटप केले.अशा या अनोख्या उपक्रमाचे पिलीवसह परिसरातुन अभिनंदन व कौतुक होत असून याचा इतर समाजसेवी संस्थांनी आदर्श घेण्याची गरज असल्याचे सामान्य नागरिकांतून चर्चिले जात आहे.

सदर कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.लेंडवे एस.डी,पर्यवेक्षक गायकवाड सर,उमेश देशमुख,दिपक माने सर,वसावे सर,वाघमारे सर,मेटकरी सर,पत्रकार संजय पाटील,लिंगे मॕडम,हिरके मॕडम, भैस मॕडम,पाटील सर, गोंजारी सर,भाऊ बोडरे,अंकुश लोखंडे यांसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.लेंडवे सर यांनी या एका नाविण्यपुर्ण उपक्रमाबद्दल उमेश देशमुख व देशमुख परिवाराचे अभिनंदन करुन सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.