धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दोन पुस्तकांचे होणार “

पिलीव / प्रतिनिधी

  • शिवामृत दूध संघाचे चेअरमन, शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी पक्षनेते धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार डी एस गायकवाड यांनी दिली.

युवक नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांचा 13 एप्रिल हा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यवस्थेला घेतलेला चिमटा आणि माहिती पुस्तिका अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. चिमटा हे वात्रटिकात्मक पुस्तक असून यामध्ये व्यवस्थेला चिमटे घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर दुसरे पुस्तक हे माहिती पुस्तक असणार आहे. यामध्ये शासकीय सर्व योजनांची माहिती, महत्वाचे दूरध्वनी क्रमांक तसेच धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या जीवनातील दुर्मिळ छायाचित्रे या पुस्तकाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार डी एस गायकवाड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *