सुळेवाडी येथे ओढा खोलीकरण व नऊ बंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामांचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते उद्धघाटन…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील नव्याने मंजूर झालेल्या 11 लाख रुपयांच्या मंजूरी कामांचे व जुन्या एकुण नऊ बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामांचे उद्धघाटन शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष मा.श्री धैर्यशील मोहिते-पाटील व माजी सभापती मा.श्री संग्रामसिंह जहागिरदार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी पिलीव गटाचे जि.प सदस्य गणेश पाटील,पिलीव गावचे सरपंच नितीन माळी,माजी सरपंच कृष्णा सुळे,सरपंच बापू करडे,उपसरपंच सोलंकर,माजी उपसरपंच दुर्योधन स़ोलंकर,काळमवाडी गावचे माजी सरपंच दादा शिंगाडे,संतोष शेंडगे(सर),ग्रामसेवक सौ.शेख मॕडम,नारायण सुळे कृषी अधिकारी विठ्ठल कोळेकर,यु.एस मोहिते,नितीन शिंदे,सुधिर बुगड उपस्थित होते.यावेळी सदरच्या कामाची माहिती कृषी अधिकारी विठ्ठल कोळेकर यांनी दिली.सुळेवाडी गावच्या संपूर्ण ओढ्याच्या रुंदीकरण व खोलीकरण कामासाठी पोकलँड मशीन मोफत उपलब्ध करून देतो त्यासाठी लागणार्या डिझेलचा खर्च ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांनी करण्यासाठी पुढे येण्याची विनंती करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी समंजसपणा दाखवून काम करुन घ्यावे आसे आवाहन मोहिते-पाटील यांनी केले.सुत्रसंचलन ग्रामपंचायत सदस्य डॉ.दत्ताराम लोखंडे यांनी तर आभार प्रदर्शन सरपंच बापू करडे यानी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *