माझे कार्यकर्ते जो निर्णय घेतील तोच माझा अंतिम निर्णय असेल – विकास धाईंजे

पिलीव/सुजित सातपुते
वयाच्या 18 व्या वर्षापासून ते आज अखेर पर्यंत निस्वार्थीपणे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असलेले माळशिरस तालुक्यातील जन सामान्यांचं व निष्ठावंत कार्यकर्त्यांचं खुलं व्यासपीठ म्हणजे विकास धाईंजे हेच नाव समोर येतं.परंतु आज त्याच विकास धाईंजे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची व काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची ध्येय धोरणे पटत नसल्याने रिपाइं मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला की काय ? अशी तालुक्यातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा चालू आहे.त्याच अनुषंगाने आज रविवार दिनांक 8 मार्च रोजी पिलीव येथील विश्रामगृहामध्ये पिलीव,शिंगोर्णी,बचेरी,कुसमोड,चांदापुरी,झिंजेवस्ती,मगरवाडी या गावातील कार्यकर्त्यांची विकास धाईंजे यांच्या उपस्थितीत विचारविनिमय बैठक आयोजित केली होती.

यावेळी धाईंजे बोलत होते की आपण आजपर्यंत ज्या पक्षांमध्ये एकनिष्ठपणे चळवळीचे काम करत राहिलो,पक्ष वाढीसाठी गाव तेथे शाखा हा उपक्रम राबवून वाड्या वस्तीवर रिपाइं पोहचवली,कोणत्याही अमिषाला बळी न पडता वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत राहीलो.परंतु आज त्याच पक्षातील काही अपवाद वगळता इतर पदाधिकाऱ्यांची व पक्षाची ध्येयधोरणे ही कार्यकर्त्यांच्या हीताची राहीली नसल्याने मी पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहे.आपला कार्यकर्ता आर्थिक दृष्ट्या कसा सक्षम होईल,त्याला शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल,तो समाजामध्ये वावरत असताना त्याला मान सन्मान कसा मिळेल.हीच माझी ध्येय धोरणे होती.व इथून पुढेही राहतील परंतु ह्या सर्व गोष्टी रिपाइंमध्ये राहून शक्य नाही.विधानसभेला रिपाइंला जागा सोडलेली असताना एखाद्या चळवळीच्या कार्यकर्त्याला उमेदवारी न देता आयात उमेदवार लादला व चळवळीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला.अशा बर्‍याच काही गोष्टी मनाच्या व आपल्या ध्येय धोरणाच्या विरोधात होत चालल्याने मी पक्षाला सोडचिठ्ठी देणार असून माझा पुढचा निर्णय माझे निष्ठावंत कार्यकर्ते ठरवतील तोच निर्णय माझा अंतिम निर्णय असेल असे धाईंजे यांनी सांगितले.यावेळी पिलीवसह परिसरातील अनेक विकास धाईंजे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *