कुसमोड येथील जि.प लक्ष्मीनगर शाळेचे वार्षकि स्नेह संमेलन उत्सहात साजरे..!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील जि.प लक्ष्मीनगर शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन 6 फेब्रुवारी रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाले.याचे उद्धघाटन पिलीव गटाचे जि.प सदस्य गणेश पाटील, निमगाव गटाचे जि.प सदस्य के.के पाटील,पिलीवचे केंद्र प्रमुख राजकुमार फासे,युवा नेते जिवन जानकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवीदास पाटील, मुख्याध्यापक कोल्हे ,माजी उपसरपंच संजय पाटील, रणजित पाटील व मान्य वरांच्या उपस्थित प्रतीमा पुजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी जि प लक्ष्मी नगर शाळा व अंगणवाडी मधील मुला, मुलींनी मराठी हिंदी गाणी ,नाटक सादर करीत उपस्थित पालक ग्रामस्थ, शिक्षकांची मने जिंकली तब्बल 31 बहारदार गाण्यांचा कार्यक्रम यावेळी मुलांनी सादर केला. हया कार्यक्रमातआदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक राजु गोरवे, चंद्रकांत धसाडे,हावळे मँडम,जुनी पेन्शन संघटनेचे नवनाथ धांडोरे, यासह सर्व च पुरस्कार प्राप्त शिक्षक, तसेच पत्रकार दामोदर लोखंडे यांना बहुजन ब्रिगेडचा पुरस्कार, सुजित सातपुते यांना पत्रकार सुरक्षा समितीचा पुरस्कार मिळाल्या बद्दल, तर संजय पाटील यांची कार्याध्यक्ष पदी निवड झालेबदल, तसेच रुद्र कोल्हे अँबँकस मध्ये देशात प्रथम व सुशांत शिंदे याची सैनिक स्कुलला निवड झालेबदल सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रम प्रसंगी जि प सदस्य गणेश पाटील, के के पाटील, जिवन जानकर, माळशिरस पं स विस्तार अधिकारी नकाते साहेब यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेच्या सर्वागीण प्रगती बाबत समाधान व्यक्त केले. मान्य वरांच्या हस्ते शाळा व्यवस्था पन समीती ,देणगीदार यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमास पंढरीनाथ लेंगरे सर,चौरे सर,शेटे सर,बुगड सर,रोकडे सर,सचिन गाटे ,हतीकर,नष्टे, रजपूत, हावळे सर,कलढोणे,सर,कर्मवीर विदयालयाचे पर्यवेक्षक गायकवाड यांच्या सह ,शाळा व्यवस्थापन समीती सर्व पदाधिकारी, प्रसंगी माजी उपसरपंच तुषार लवटे, पत्रकार अभिजीत तावरे, गणेश देशमुख ,बुवा पवार, सागर गोंजारी,शशिकांत घडयाळे,नाथा पवार, नाथा मदने, झिंजेवस्ती चे उपसरपंच प्रकाश पाटील, माजी उपसरपंच सर्जेराव मदने, यांच्या सह कुसमोड, झिंजेवस्ती, पिलीव परिसरातील ग्रामस्थ, मान्य वर पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थिती त होते. प्रास्ताविक सुनील डुरे सर यांनी केले तर सुत्रसंचालन सुहास कोल्हे सर यांनी तर आभार अंगणवाडी सेविका सत्य भामा मदने यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *