पिलीव येथील गुटखा विक्री करणारा इरफान शेख अन्न व औषध प्रशासनाच्या जाळ्यात
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील गुटखा विक्री करणारावर गावातीलच अनोखी इसमाच्या तक्रारी वरून
आज दि.१२/०३/२०२० रोजी अन्न व औषध प्रशासन यांनी पिलीव ता. माळशिरस येथील इरफान रसूल शेख,वय ३२ वर्षे,रा.पिलीव यांचे मेन चौकातील तौहिद पान शॉप व तरकारी कॉर्नर या पेढीची तपासणी केली असता त्यात गोवा,विमल,एस ९९,सुपर जेम व इतर विविध ब्रॅण्डचा गुटख्याचा अंदाजे रु ९९५०/- किंमतीचा साठा विक्री हेतू साठविल्याचे आढळले तर याबाबत साठा मालकास चौकशी केली असता आपण स्व:त विक्री हेतु चडचण कर्नाटक येथून आणला असल्याचे सांगितले.
सदर साठ्यामधून अनौपचारिक अन्न नमुने घेऊन उर्वरित साठा जप्त करण्यात आला व सदर इसमाविरूद्ध माळशिरस पोलिस स्टेशन येथे भादंवि ३२८,१८८,२७२,२७३ कलमांतर्गत गुन्हां दाखल झाला असून अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कलम ५९ नुसार फिर्याद देण्यात आली आहे. सदर कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री.पी.एम राऊत यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले यांनी सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, मंगेश लवटे, उमेश भुसे व योगेश देशमुख यांच्या सहकार्याने पार पाडली.सदर प्रकरणाचा पुढील पोलिस निरीक्षक विश्वंबर गोल्डे व पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवाजी पराडे हे करीत आहेत.
