खुडूस झंजेवाडी रस्त्यासाठी 1कोटी 20 लाख मंजूर – अजय सकट
माळशिरस/प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला खुडूस झंजेवाडी या रस्त्याच्या देखभाल ,दुरुस्ती, डांबरीकरणाच्या कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चालू आर्थिक बजेटमध्ये 1कोटी 20 लाखाचा निधी रुपयांचा मंजूर केला असल्याची माहिती खुडूस पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी दिली
माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर व माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे,जि प सदस्य बाळासाहेब धाइंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे सदस्य अजय सकट, अँड शहाजी ठवरे ,तुकाराम ठवरे हे या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून गेली 3 वर्षांपासून प्रयत्न करीत होते तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडेही वेळोवेळी पाठपुरावा केला होता परंतु त्यास यश येत नव्हते परंतु अजय सकट यांनी पाठपुरावा करण्याचे सोडले नव्हते महाविकासआघाडीचे सरकार येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण,पालकमंत्री दिलीपराव वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सहकार्याने या रस्त्यासाठी 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यावेळी तुकाराम ठवरे,रामचंद्र चौगुले, धनाजी साठे,उपस्थित होते