कोरोनो बाबत जनजागृती शाळा स्तरावर राबवणे महत्वाचे – डॉ-कुमार लोंढे

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यतील चांदापुरी येथे सोशल या संस्थेच्या वतीने सदाशिव देठे प्रशाला व ज्यू कॉलेज व डायमंड इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांना कोरोनो बाबत सतर्क राहण्याचे आवाहन करून शाळा स्तरावर याची अमलबजावणी व जनजागृती होणे महत्त्वाचे आहे असे मत संस्थापक डॉ.कुमा लोंढे यांनी केले.


यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले” चीन सारखा बलाढ्य देश घायाळ झाला असून देशात व राज्यात कोरोनो ने शिरकाव केला आहे याबाबत घाबरून न जाता प्राथमिक लक्षणे दिसल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधून आपण आपले कुटुंब,परिसर,शाळा ,सार्वजनिक ठिकाणे इ बाबत दक्षता घेऊन स्वछता बाळगून संसर्ग रोखणे हे प्राथमिक कर्तव्य सर्वांनी बजावून कोरोनो हद्दपार केला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.दीपक काटे,प्रा.अल्ताफ पठाण,प्रा. नितीन सरक, प्रा.विठ्ठल धाइंजे,साजिद पठाण सर ,डी.जी लोंढे सर,कोमल शेटे मॅडम,उरवणे मॅडम इ नि केले तर आभार प्रा.कुंडलिक साठे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *