अजोबा मयत झाले असतानाही नातवाने दिला दहावीचा पेपर : पिलीव येथील कर्मवीर विद्यालयातील घटना…!

पिलीव/सुजित सातपुते
पिलीव (कुसमोड) येथील राजकुमार कुंभार यांचे वडील धोंडीबा बुवाजी कुंभार यांचे आज सोमवार दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 10:00 वा.सुमारास अल्पशा अजाराने निधन झाले.परंतु मयत धोंडीबा कुंभार यांचा कर्मवीर विद्यालय पिलीव येथे इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेला नातू रोहीत राजकुमार कुंभार याने आपल्या आजोबाचे निधन झाल्याचे दुखः असतानाही इयत्ता दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर दिला आहे.आजोबावर नातवंडाचे व नातवंडावर अजोबाचे प्रेम म्हणजे अपुलकीचा झरा असतो.आज कुंभार कुटुंबातील तोच मायेचा झरा आटला असला तरी आपल्या नातवाने शिक्षणाला फाटा द्यावा किंवा परिक्षा बुडवावी हे कोणात्याच अजोबाला वाटणार नाही.त्यामुळे रोहीतने आपल्यावर दुखाचा डोंगर कोसळला असतानासुध्दा परिक्षा न बुडविता पेपर दिला असल्याने पिलीवसह परिसरामध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.रोहीतच्या या शैक्षणिक जिद्दीला विद्यालयाचे मुख्यद्यापक श्री.लेंडवे एस.डी सर यांनी शब्बासकीची थाप दिलीच दिली.परंतु त्याच्या मयत अजोबांनाही चिर शांती लाभेल हे मात्र नक्की…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *