चांदापुरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोष युवा मनाचा व पुरस्कार सोहळा दिमाखात साजरा..!


पिलीव/प्रतिनिधी

माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे सालाबादप्रमाणे या वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोष युवा मनाचा व पुरस्कार वितरण सोहळा सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज आणि डायमंड इंग्लिश स्कूल च्या पटांगणात उत्साहात साजरा करून उद्योग क्षेत्रातील महत्वाचा पुरस्कार उद्योजक मा.तानाजी सावर्डेकर यांना महात्मा फुले युवा उद्योजक पुरस्कार तर सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल लोकराजा छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पुरस्कार मा.विकास दादा धाइंजे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य बाळासो धाइंजे,वंचितचे अरुण वाघमारे ,संस्थापक डॉ.कुमार लोंढे,सचिव डॉ.पंचशीला लोंढे सरपंच द्रौपदी कवळे,पूजा लाडे इ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे करण्यात आले.कॉलेज व शाळेच्या विद्यार्थ्यांनी माय मराठी…इंडिया वाले….आई मला खेळायला जाऊ दे ना…नाद खुळा..इ गाण्यावर जबरदस्त नृत्य अविष्कार करून उपस्थितांची दाद मिळवून चांदापुरी, तरंगफळ, गारवाड,पठाणवस्ती,कुसमोड या पालकांची शाबासकी मिळवली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष “प्रा.भीमराव चंदनशिवे म्हणाले ग्रामीण भागात महापुरुषांचा विचार घेऊन चालणारी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून नावारूपास आली आहे.डॉ.कुमार लोंढे म्हणाले” पालकांची मुले शिशु गटापासून इंग्रजी,सेमी इंग्रजी,मराठी,कला,विज्ञान,स्पर्धा परीक्षा,शिष्यवृत्ती, सीईटी इ माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात त्यामुळे शहरातील सर्व सोयी चांदापुरी सारख्या गावात उपलब्ध आहेत त्याकरिता पालकांनी सहकार्य करणे महत्वाचे आहे.


शाळेला सढळ देणगी देणारे भटक्या समाजाचे नेते मारुती सरगर,माळशिरस कोर्ट ऍड.धनंजय बाबर व बाळासो जाडकर यांचा दातृत्व प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
खेळ, स्पर्धा परीक्षा, विविध कलागुण बारावीच्या कला व विज्ञान शाखेतील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक सुरेश देठे,उद्योजक भैय्या बाबर कराटे प्रशिक्षक संजय होवाळ, रिपाइंचे मिलिंद सरतापे,विजय कोकणे जयवंत सूळ नवभारतचे लहू लोंढे उपरपंच शशी साळवे,अशोक पाटील,मेजर कांबळे इ मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.नितीन सरक, प्रा.कुंडलिक साठे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक स्नेहल उरवणे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *