पिलीव येथील परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून केले स्वागत…!

एकुण 445 विद्यार्थी देणार परीक्षा : यंत्रणा सज्ज..!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये दहावीचे परीक्षा केंद्र आहे.या परीक्षा केंद्रात यंदा 445 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.या विद्यार्थ्यांचे आज मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी विद्यालयाचे मुख्यद्यापक श्री.लेंडवे सर,ग्रा.पं सदस्य अविनाश जेऊरकर,पत्रकार प्रमोद भैस,ॲड.सत्यजीत गलांडे,सचिन गांधी,श्रीमती सातपुते के.डी,अतुलकुमार पाटील सर,माने सर यांनी पहिल्या पेपर दिवशी परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले व तणावमुक्त पेपर लिहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.सदरच्या केंद्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विदयालय,जवाहरलाल शेतकी विदयालय, प्रतापसिंह विदयालय चांदापुरी,सिध्दनाथ हायस्कूल तरंगफळ,विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय शिंगोर्णी या विद्यालयातील हे एकुण 445 विद्यार्थी आहेत.या परिक्षार्थी विद्यार्थ्यांनची सोय एकुण अठरा ब्लॉक मध्ये केली आहे.यामध्ये एक ते आठ ब्लॉक नवीन इमारत तर नऊ ते अठरा ब्लॉक जुनी इमारत याठिकाणी सोय केल्याचे केद्रसंचालक श्री.लेंडवे एस.डी सर यांनी सांगितले.परीक्षा केंद्रावर पाणी, विज,वैद्यकीय सेवा, पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असल्याची माहिती केंद्र संचालक यांनी दिली.या परीक्षेसाठी उपकेंद्र संचालक म्हणून गायकवाड सर व मारकड सर काम पाहणार आहेत.केंद्र संचालक लेंडवे सर यांनी ही परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त व पारदर्शक पार पाडण्यासाठी पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *