दहावीच्या विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करावे – डॉ.कुमार लोंढे

पिलीव / प्रतिनिधी

माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे सदाशिवराव देठे प्रशाला व ज्यू कॉलेज चा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ .कुमार लोंढे म्हणाले जिद्द व चिकाटीच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करता येतात त्याकरिता आपणाकडे आत्मविश्वास पाहिजे कोणताही विद्यार्थी वाईट नसतो वाईट असतो तो दृष्टिकोन आणि याकरिता आम्ही अविरत प्रयत्न करून विद्यार्थ्यांमध्ये उद्याचा भारत शोधतोय असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी दाहवीचे विद्यार्थी अयाज पठाण ,अनिकेत सरतापे प्रा.दीपक काटे,प्रा.विठ्ठल धाइंजे’ मुख्याध्यापिका स्नेहल उरवणे इ नी मनोगत व्यक्त केले
प्रमुख पाहुणे माजी पोलीस निरीक्षक देठे साहेब,नवनाथ वाघम्बरे इ मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा.नितीन सरक यांनी केले.शेवटी आभार शेटे मॅडम यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *