अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडचा संयुक्त मेळावा व पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न..!
पिलीव/प्रतिनिधी झ
राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडचा संयुक्त मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी काल रविवार दिनांक 1 मार्च रोजी अकलूजमध्ये आयोजित केला होता.
सदर मेळावा बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सह संयुक्त मेळावा व विवीध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे,नगरसेवक आप्पासाहेब देशमुख,पंचायत समिती सदस्य अजय सकट,प्रांतिक सदस्य माने पाटील,सुजय माने-पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबा माने,बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे,जनसेवेचे सुधीर रास्ते,रणजित देशमुख,युवा सेनेचे तालुका अध्यक्ष गणेश इंगळे,धनाजी काळे,के पी काळे,धनाजी पाटील,नवनाथ ननावरे,सोमनाथ शेळके,नानासाहेब खंडाळे,राजेश खरे,पिंटू एकतपुरे,सचिन मोरे,उदय कांबळे,ऋषीपाल बनसोडे,मल्हारी लोखंडे,आनंद मिसाळ,विजय कवळे,अजिनाथ साठे,रफिक मुलाणी,सागर कोळी इत्यादी उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांच्या सह सर्व मान्यवरांच्या हस्ते,आदर्श पत्रकार म्हणून मिलिंद गिरमे,दामोदर लोखंडे,निर्भीड पत्रकारिता म्हणून श्रीनिवास कदम पाटील,युवा पत्रकार म्हणून शाहरुख मुलाणी,दलित मित्र म्हणून पांडुरंग गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते म्हणून शंकर वाघमारे,माळेवाडी भूषण म्हणून अक्षयकुमार काटे,शेतकरी मित्र म्हणून जाकीर शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात उत्तमराव जानकर,किरण साठे,बाळासाहेब धाइंजे,आप्पासाहेब देशमुख, सुजय माने पाटील,पी एस गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कर्चे यांनी केले तर आभार अनिल साठे यांनी मानले.