महाराष्ट्र वीरशैव सभेच्या नूतन प्रदेशाध्यक्ष पदी श्री.प्रबुद्धचंद्र झपके यांची निवड..!

पिलीव/प्रतिनिधी
या निवडी निमित्त लिंगायत समाज मंडळ,अकलूज व महाराष्ट्र वीरशैव सभा,माळशिरस तालुक्याच्यावतीने झपके यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सत्कारास उत्तर देताना श्री.प्रबुद्धचंद्र झपके यांनी भाषणात वीरशैव लिंगायत समाजाची राज्य पातळीवरील आद्य संस्था म्हणून कार्यरत असणारी १९७४ साली नीलकंठराव कल्याणी,नामदेव रुकरी डॉ.शिवमूर्ती शाहीर यांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीण हितासाठी महाराष्ट्र वीरशैव सभेची स्थापना केली.यापुढेदेखील आरक्षण व धर्म मान्यता यासारख्या प्रश्नातील बारकावे-अडचणी समजून सर्वांना सोबत घेऊन सरकार दरबारी न्याय मिळवू,मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक,गरजूना शैक्षणिक शिषुवृत्ती असेल.समस्त महाराष्ट्रातील लिंगायत एकजूट असेल यासाठी आपल्या सर्वांच्या साथीने नक्कीच यशस्वी होऊ.असे ते म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा युवकाध्यक्ष उत्कर्ष शेटे यांच्या हस्ते फेटा,शाल श्रीफळ व महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा देऊन सत्कार करणेत आला.
श्री.गिरीश नष्टे,अमर लोखंडे,बाळासाहेब झपके,यांचाही सत्कार करणेत आला.
यावेळी जेष्ठ समाज बांधव चंद्रकांत कुंभार,सतेज दिवटे गुरुजी,चंद्रकांत शेटे,राजू आर्वे, नितीन आर्वे,उपाध्यक्ष विलास क्षिरसागर,तालुकाध्यक्ष महादेव पाटील,तालुका सचिव सुहास उरवणे,शिवराज पाटील,रामलिंग हांडे-सोनाके,अशोक ज.शेटे,विठ्ठल बागल, अतुल शेटे,उमेश नडगिरे,उदय शेटे,राजू गाढवे,सचिन गुळवे,चंदन सरताळे,दिग्विजय शेटे,उमेश गुळवे,ऋषिकेश शेटे,ऋषिकेश नष्टे,
उपस्थित होते.