शिवराज पुकळे यांना सा.बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे यांचे अश्वासन..!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव-बचेरी रस्त्याचा विषय चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.राज्य मार्ग १४५ ते पिलीव ईटकी रस्त्यावरील पिलीव ते बचेरी रोडवर भरपुर खड्डे पडले आहेत.यामुळे आत्तापर्यंत अनेकवेळा अपघात झाले आहेत यासंदर्भात शिवराज पुकळे यांनी दि.३१/०१/२०२० रोजी रस्तारोको अांदोलनाचे निवेदन दिल्या नंतर दिनांक ०१/०२/२०२० रोजी सर्वजनिक बांधकाम उपविभागीय क्र.०२ अकलुज यांनी त्या देखभाल दुरुस्तीचे काम असणार्या शिवरत्म कंन्स्ट्रक्शन कंपनी अकलुज यांना दोन दिवसात ते खड्डे भरुन घ्या अथवा कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे पत्र काढले .हे पत्र काढुन सुद्धा एक महिना झाला.तरीही खड्डे भरले नाहित अथवा कंन्स्ट्रक्शन कंपनी वर कोणतीही कारवाई केलेली नाही.उपअभियंता मा.केदार साहेब व कार्यालयात याबाबत विचारले असता कंन्स्ट्रक्शन कंपनी ला सांगा कंन्स्ट्रक्शन कंपनी आमचे ऐकत नाही अशा प्रकारची टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात असे शिवराज पुकळे यांनी सा.बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे यांना सांगीतले.
सध्या १०वी व१२ वी च्या परीक्षा चालु आहेत अश्या रस्त्याने जाताना जिव मुठीत धरुन जावे लागत आहे त्यामुळे लोकांना वेठीस धरणार्या संबधीत अधिकारी व देखभाल दुरुस्तीचे काम न करणार्या कंन्स्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्यात यावी आणी रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी आशी मागणी शिवराज पुकळे यांनी केली.सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.दत्तात्रय भरणे मामा यांनी शिवराज पुकळे यांचे ऐकून घेतल्यानंतर या विषयाची गांभीर्यता लक्षात घेवुन संबधीतावर तातडीने कारवाई चे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले असल्याचे पुकळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *