पिलीव ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र भूषण आदरणीय ति.डॉ श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांचा प्रतिमा अनावरण सोहळा उत्सहात संपन्न…!

पिलीव/सुजित सातपुते नियोजन, स्वच्छता, स्वयंशिस्त तसेच व्यवस्थापन पाहता प्रतिष्ठानचे कार्य गौरस्वापद आहे.प्रतिष्ठानच्या माध्यमातुन समाजसेवा म्हणजेच ईश्वरी कार्य सुरू आहे.कोणालाही मीपणाचा स्पर्श नसुन सर्वांच्यात पाहायला मिळालेला एकोपा पाहून प्रतिष्ठानचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असुन महाराष्ट्रभुषण नानासाहेब धर्माधिकारी यांची जगभरात व्यापकतेने उभी केलेली संतशिकवण व त्यांचे समाजहितपयोगी उपक्रम पाहता देशाला प्रगतीपथावर नेणारी आहे.तसेच आज डॉ.नानासाहेब यांचा जन्मदिवस व त्यांच्या प्रतिमा अनावरण सोहळा हे आमच्यासाठी महद भाग्य होय.शरीरातील सुप्त गुणांना प्रज्वलित करत,देव आपल्यातच आहे असा संदेश देत संतशिकवणुकीतले संस्कार उभे करत उच्च – नीच,गरीब -श्रीमंत भेद संपवत मानवता हाच धर्म आणि मनुष्य हीच जात अशी स्वदेव,स्वदेश,स्वधर्म या त्रिसुत्रीला धरून व्यापक शिकवण आहे.या शिकवणुकीतुन लाखो करोडोजण सुख – समाधानाने जीवन जगत असुन सदृढ शरीर व सदृढ मनाने श्री.समर्थ बैठकीच्या माध्यमातुन आत्मिक सुख मिळत असुन अंधारातुन प्रकाशाकडे तसेच दुखातुन सुखाकडे नेणारा हा मार्ग आहे.

या शिकवणुकीतील श्रवणभकती समाजाचे व्यक्तीमत्व घडवत आहे.प्रतिष्ठानचे कार्य अनमोल आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधानपरिषद आमदार रामहरी रूपनवर यांनी केले.दरम्यान या कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर,कृषी व पशु संवर्धनचे माजी सभापती संग्रामसिंह जाहगिरदार,जि.प सदस्य गणेश पाटील,बाळासाहेब धाईंजे,पं.स सदस्या सौ.ताई महाडिक,पिलीव गावचे सरपंच नितीन मोहिते,माजी सरपंच संग्राम पाटील,अमोल पाटील,अॅड.भास्करराव गुंडगे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.समर्थ बैठकीच्या माध्यमातुन सुदृढ,निरोगी,निष्पाप व वैचारिक अधिष्ठान असलेली पिढी घडविण्याचे कार्य थोर समाजप्रबोधनकार महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी केले.जगात एकमेव सशक्त समाजमन घडविणारे ठिकाण म्हणुन श्री.समर्थ बैठकच होय.अध्यात्मातुन समाज प्रबोधनाचे कार्य खऱ्या अर्थाने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान करत आहे.त्यामध्ये युवकांचा सहभाग देखील लक्षणीय आहे.

ग्रामपंचायत पिलीव ता. माळशिरस व महाराष्ट्रभुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा ता.अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिलीव येथील कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात लावण्यात आलेल्या थोर समाजप्रबोधनकार,महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचा अनावरण सोहळा रविवार दि. १ मार्च रोजी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.दरम्यान या सोहळया प्रसंगी अडीच ते तीन हजारापर्यंत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी प्रतिष्ठानच्या माध्यमातुन समाज प्रबोधन तसेच अनेकविध वृक्षारोपण,स्वच्छता अभियानासारखे अनेक सामाजिक उपक्रम हे गौरवास्पद आहेत.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या शिकवणुकीतुन दिली जाणारी शिकवण पाहता अज्ञान नष्ट करून देणारी आहे. निश्चितच पुढील पिढीसाठी या शिकवणुकीचा फायदा होत आहे. तसेच देव व मानवता धर्माची शिकवण खऱ्या अर्थाने प्रतिष्ठानच्या माध्यमातुन मिळत आहे.असे माजी सभापती संग्रामसिंह जाहगिरदार यांनी सांगितले.
दरम्यान चेअरमन उत्तमराव जानकर म्हणाले की कल्याणकारी कार्याचा वसा संपुर्ण जगभरात सर्वसामान्य व तळागाळापर्यंत पोहचवणे हे कार्य बैठकीच्या माध्यमातुन होत आहे. तसेच अनेक समाजपयोगी उपक्रम महाराष्ट्र भुषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संस्थापक पदमश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने रायगड भुषण सचिन दादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी, राहुल दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न होत आहे.
चौकट – महाराष्ट्रभुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य आज पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच रायगडभूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातुन अखंडीतपणे सुरू असून त्यांच्या या सामाजिक कार्यात राहुलदादा धर्माधिकारी , उमेशदादा धर्माधिकारी यांची मोलाची साथ लाभत आहे.रेवदंडा ता. अलिबाग येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गरीब – गरजूंना शालेय साहित्य वाटप, मुक- बधीर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप,रकतदान शिबीरे, मोफत आरोग्य तपासणी, बेरोजगार युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वाहन परवाना काढून नोकरीची संधी, प्रौढ शिक्षण, पाणपोई, प्रवाशांसाठी बस थांबा, तलावातील गाळ काढणे, तैलचित्रातुन समाजप्रबोधन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान, जलपुनर्भरण, निर्माल्यापासुन खत निर्मिती, स्मशानभुमी व दफनभूमी स्वच्छता अभियान असे अनेकविध उपक्रम प्रतिष्ठानमार्फत आजपर्यंत यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. नवी मुंबई येथील आरोग्य शिबीराची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. या कार्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत सुंदर भारत अभियानांतर्गत पदमश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची राज्यपाल नियुक्त स्वच्छता दुतपदी निवड झालेली आहे
चौकट – महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पिलीव ता. माळशिरस ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी संपन्न झालेल्या प्रतिमेचा अनावरण सोहळयाच्या पाश्र्वभूमीवर पिलीव या ठिकाणी शनिवारी सकाळी गावात १०० श्रीसदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्यातुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. या स्वच्छता अभियान प्रसंगी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे गावातील ग्रामस्थांतुन कौतुक करण्यात आले.
चौकट – गावात प्रारंभ करतानाच सर्वत्र रांगोळीचा सडा पाहुन संपुर्ण गावातील वातावरण प्रसन्न व आनंदी पाहावयास मिळत होते. तसेच ठिकठिकाणी सदस्य हात जोडून उभे राहून मान्यवरांचे स्वागत करतानाचे चित्र पाहून हात जोडायला लावणारी महाराष्ट्र भुषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी, पदमश्री आप्पासाहेब धर्माधिकारी , रायगड भुषण सचिनदादा धर्माधिकारी यांची शिकवण सर्वश्रेष्ठ आहे तसेच कार्यक्रमातील शिस्त पाहुन विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आयोजकांवर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव केला.
चौकट – ग्रामपंचायत पिलीव येथे महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा अनावरण सोहळया प्रसंगी कार्यक्रमातील सुसुत्रता, शिस्तबद्धता पाहुन मान्यवरांनी कौतुक केले. आत्तापर्यंत आम्ही एवढे कार्यक्रम पाहिले परंतु या कार्यक्रमातील सदस्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहता ,न उलगडणारे गुढच आहे.निश्चितच समर्थविचारातुन हे तेज प्राप्त झालेले आहे.असे गौरवोदगार माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार यांनी काढले.