जेष्ट पत्रकार दामोदर लोखंडे यांना आदर्श पत्रकार तर शाहरुख मुलाणी यांना युवा पत्रकार पुरस्कार जाहीर..!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील दै.पुढारीचे जेष्ट पत्रकार तथा पिलीव गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री.दामोदर लोखंडे यांना बहुजन ब्रिगेड या संघटनेचा आदर्श पत्रकार तर कोळेगाव येथील दै.पंढरी भूषणचे पिलीव प्रतिनिधी शाहरुख मुलाणी यांना युवा पत्रकार पुरस्कार जाहीर झाला असल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.पत्रकारीतेच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या भूमिका मांडल्या आहेत.त्याचप्रमाणे आपण सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडवून आपण आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजापर्यंत विविध शासकीय योजना पोहचवून गरजूंना त्याचा लाभ मिळवून देण्याचे काम केले आहे.त्यामुळे आम्हांला आपला अभिमान वाटतो.असे बहुजन ब्रिगेड संघटनेने जाहीर केलेल्या पुरस्कार पत्रकात म्हटले आहे.सदरचा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 1 मार्च 2020 रोजी सायंकाळी 5:30 वाजता अकलुज येथील आण्णाभाऊ साठे नगर येथे होणार असून सदरच्या कार्यक्रमासाठी चळवळीच्या सर्व कार्कर्त्यांनी उपस्थित रहावे असे बहुजन ब्रिगेड संघटनेचे सर्वेसर्वा श्री.किरण साठे यांनी आवाहन केले आहे.सदरचा पुरस्कार जाहीर झाला असल्याने दामोदर लोखंडे व शाहरुख मुलाणी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *