पिलीव येथील करण उर्फ बंडू काळे या तरुणाची गळफास घेवून आत्महत्या..!
पिलीव/प्रतिनिधी
करण उर्फ बंडू बाळासो काळे (वय 22) रा.पिलीव(झिंजेवस्ती)या तरुणाने काल बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी अर्ध्या रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याने पिलीवसह परिसरावर शोककळा पसरली आहे.करण म्हणजे संपूर्ण पिलीव गाव चा लाडका बंडू म्हणून परिचित होता.परवाच त्याने माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांना आपल्या घरी नेऊन त्यांचा सत्कार केल्याचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले होते.भाजप नेते राहुल मदने यांचा विश्वासू व कट्टर कार्यकर्ता म्हणून करणचि तालुक्यात ओळख निर्माण झाली होती.त्यामुळे मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी ख्याती असणारा करण आपल्याला सोडून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.गळफास घेण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.