स्व.कैलास (भाऊ) दडस प्रतिष्ठानच्यावतीने सुळेवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप करुन केले वृक्षारोपन…!

पिलीव/सुजित सातपुते
स्व.कैलास (भाऊ) दडस प्रतिष्ठान सुळेवाडी व सतोषा प्रतिष्ठान यांच्यावतीने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुळेवाडी येथे शैक्षणिक साहित्य व रोपांचे वाटप करुन वृक्षारोपन करण्यात आले.सुळेवाडी जिल्हा परिषद शाळेमधील एकुण १७० विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा वह्या,पेन,पेन्सिल,खोडरबर,पाण्याची बाटली,दप्तर व एक झाड देण्यात आले.या कार्यक्रमासाठी युवासेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख स्वप्नील (भैय्या) वाघमारे,माळशिरस तालुका प्रमुख शिवराज पुकळे,नवलकुमार गाडे,शंकर मेटकरी,सुभाष भोसले,तसेच शिव वाहतूक सेना वसई तालुका अध्यक्ष व स्व.कैलास (भाऊ) दडस प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.अशोक सुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.तानाजी चव्हाण (सर) यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री.लेंगरे सर यांनी केले.यावेळी मदने मॅडम,वठारे मॅडम, बुरांडे मॅडम,बगाडे सर,धोत्रे सर इत्यादी शिक्षक,ग्रामस्त,पालक वर्ग व पत्रकार बांधव उपस्थित होते.स्व.कैलास (भाऊ) दडस यांचा सामाजिक उपक्रम राबविण्याचा वारसा चालू ठेवून अशीच एक मैत्री ती म्हणत अशोक सुळे यांनी जो आज नाविण्यपुर्ण उपक्रम राबविला त्यामुळे आज स्व.कैलास भाऊंच्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे सुळेवाडी ग्रामस्तांच्या मधून ऐकायला मिळत होते.