अविनाश जेऊरकर यांना महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समितीचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार जाहीर…!
पिलीव/प्रतिनिधी
महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात 18 फेब्रुवारी रोजी पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.यावेळी डॉ.आशिषकुमार सुना,डॉ राजेंद्र शहा,राज्य सल्ला गार डॉ.संतोष कुलकर्णी,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस यांच्या निवड समीतीने 2020 हया वर्षीचे राज्य स्तरीय पुरस्कार जाहीर केले. यामध्ये माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील श्रीराम पतसंस्थेचे माजी चेअरमन, तथा अष्ठविनायक गणेश मित्रमंडळाचे संस्थापक व पिलीव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा पिलीव येथील आठवणी 95 च्या माजी विद्यार्थी संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पिलीव परिसरातील सर्वच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या बरोबर हिरहिरीने सहभागी होऊन ते सतत कार्यशील असतात.त्यांना पत्रकार सुरक्षा समीतीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कुषी व पशुसंवर्धन सभापती संग्रामसिंह जहागीरदार, जि.प सदस्य गणेश पाटील, पिलीव चे सरपंच नितीन मोहिते, उपसरपंच व सर्व सदस्य, माजी विद्यार्थी संघटना आठवणी 95 ग्रुप,अष्ठविनायक गणेश मित्रमंडळ ,पिलीव पत्रकार संघ, विरशैव लिंगायत वाणी समाज संघटना यांच्या सह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडुन जेऊरकर यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.