कर्मवीर विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन सोहळा संपन्न…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आज गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोजी एसएससी(इयत्ता दहावी) मार्च 2020 परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन सोहळा संपन्न झाला.या शुभचिंतन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री एस.डी लेंडवे सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी ऋषिकेश मदने उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यालयात त्यांना मिळालेल्या ज्ञानाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी लेंडवे सरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जात असताना आपली नेमकी कोणती भूमिका असावी यासंदर्भात मार्गदर्शन केले.तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी ऋषिकेश मदने यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यात कसे वागावे यासंदर्भात मार्गदर्शन केले.विद्यालयाचे पर्यवेक्षक गायकवाड सर,ज्येष्ठ शिक्षक बेसिकराव सर,अतुल पाटील सर तसेच श्री. एन.व्ही.माने सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बेसिकराव सर यांनी केले.तर आभार झाडे आर.आर यांनी मानले.